सांगोला तालुका

स्व. आम. काकासाहेबांच्या सामाजिक कार्याचा वारसा निरंतर सुरू ठेवणार : मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील ; शिवणे व नाझरे येथील नेत्र तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद…!!

राजकारण म्हणून आपण कधीच समाजकार्य करत नाही, तर ज्या मातीत आपण जन्म घेतला त्या मातीच्या उपकरातून उतराई होण्यासाठी स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी दिलेल्या शिकवणीनुसार निरपेक्ष भावनेने आपण सामाजिक कार्य करत आहोत. यापुढील काळातही स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा निरंतर सुरू ठेवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले. नाझरे ता. सांगोला येथे स्व. काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथी निम्मित आयोजित नेत्र तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिरास त्यांनी भेट दिली यावेळी दिपकआबा बोलत होते.
यावेळी युवा नेते डॉ. पियुष साळुंखे पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिल खटकाळे, भिकाजी बाबर, ज्ञानेश्वर बाबर, डॉ. राज मिसाळ, बसवेश्वर आदाटे, पांडुरंग वाघमारे, इमरान काझी, सुशांत ऐवळे, महादेव पवार, आनंदा कोकरे, गणेश कोळेकर, अनिल जगदाळे, नागेश रायचुरे, ओंकार देशपांडे आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संभाजी हरिहर सर उपस्थित होते.
पुढे बोलताना दिपकआबा म्हणाले, स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील यांनी संपूर्ण हयात भर कसलीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिक भावनेने सामाजिक कार्य केले आमदार असताना अनेक लोकहिताची कामे करून त्यांनी आपल्या कामाचा आदर्श घालून दिला आहे. याच आदर्शावर संपूर्ण साळुंखे पाटील परिवाराची वाटचाल सुरू आहे त्यामुळेच आज तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यभर साळुंखे पाटील परिवाराने अनेक जिवाभावाची लोक कामवाली आहेत. राजकारण आणि समाजकारनात हीच आपली संपत्ती असल्याचेही त्यांनी शेवटी आवर्जून नमूद केले.
स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगोला तालुक्यात सर्वत्र सुरू असणाऱ्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मांजरी ता. सांगोला नंतर बुधवार दि.२९ रोजी शिवणे व नाझरे ता.सांगोला येथे आयोजित शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाझरे येथील शिबिरात सुमारे १५० रुग्णांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली यापैकी ३४ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. नाझरे येथील शिबिराचे उद्घाटन डॉ पियुष साळुंखे पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल खटकाळे यांनी केले. या शिबिरात नाझरे व परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला.
शिवणे ता. सांगोला येथील शिबिराचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांनी उद्घाटन केले. यावेळी शिवणे गावचे लोकनियुक्त सरपंच दादा घाडगे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी जयमालाताई गायकवाड यांनी स्व. काकांच्या आठवणींना उजाळा देत काकांनी आणि काकींनी राजकारण आणि समाजकारनात जी शिकवण आणि आदर्श घालून दिले आहेत त्यावर शेवटच्या श्वासापर्यंत आपण चालत राहू असा विश्वास व्यक्त केला. शिवणे येथील शिबिरात सुमारे १२५ नागरिकांनी सहभाग नोंदवला यापैकी २५ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. स्व.काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथी निम्मित आयोजित हे शिबिर २८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान चालणार आहे. शिबिराच्या शेवटी ज्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड झाली आहे त्या सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल असे स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!