दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी चोरीची घटना

सांगोला (तालुका प्रतिनिधी): अज्ञात चोरट्याने शेतकऱ्याची नजर चुकवून स्कूटीच्या डिकीतील ७० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना सांगोला शहरातील भाजीमंडई जवळ घडली. दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सिद्धेश्वर गणपत पवार रा. कोपटेवस्ती ता. सांगोला यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सिद्धेश्वर गणपत पवार यांनी २४ जून रोजी महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून ७० हजार रुपये सदरची रक्कम रुमालात गुंडाळून पिशवीत टाकुन पैशाची पिशवी एम एच.४५ वाय ८६२० या स्कूटी च्या डिकीत ठेवून डिकी लॉक केली होती. त्यानंतर भाजी मंडईमध्ये आल्यावर पवार यांनी स्कुटी दत्ता जाधव यांचे भाजीचे स्टॉलजवळ उभी करुन डिकीतील पैश्याची पिशवी काढुन घेवून मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी गेले होते. त्यांनी भाजीपाला घेवून भाजीपाला व पैशे असे पिशवीत ठेवून स्कुटीजवळ येवून डिकीचे लॉक काढून पिशवी डिकीमध्ये ठेवली.
त्यावेळी स्कुटीचे मुठीवर काहीतरी पडल्याचे दिसल्याने त्यांनी स्कुटी तशीच सिद्धेश्वर लिंगे यांच्या चहाचे स्टॉलपर्यंत ढकलत नेवून उभी केली.

 

चहाच्या स्टॉलवरुन पाणी घेवून स्कुटीवर टाकले. त्यानंतर पवार हे स्कूटी वरून गायकवाड यांच्या दुकानात जावून दोन कीटकनाशकच्या पुड्या घेवून सदरच्या पुड्या घेवून डिकीमध्ये ठेवण्यासाठी डिकी उघडली असता त्यामध्ये ठेवलेली पैश्याची पिशवी दिसून आली नाही. म्हणुन त्यांनी तेथे व चहा स्टॉलजवळ शोध घेतला परंतु पैशाची पिशवी मिळून आली नाही. डिकीचे लॉक काढलेल्या अवस्थेत स्कूटी उभा करून लिंगे यांच्या चहाचे स्टॉलवरून पाणी आणण्याच्या वेळेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने डिकीतील पैश्याची पिशवी चोरुन घेवून गेल्याची सिद्धेश्वर पवार यांची खात्री झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button