सांगोला तालुकामहाराष्ट्र

सांगोला नगरपरिषदेच्या बचत गटांना पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत(PMFME) र.रू.सहा लाख साठ हजार इतक्या बीज भांडवलचे वितरण

सांगोला- दि. 25/01/2023: दि.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) ही केंद्र पुरस्कृत योजना सांगोला नगरपरिषद राबवित आहे. सदर योजना ही शहरी दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सन २०१४-१५ पासून कार्यान्वीत झालेली आहे.या अनुषंगाने शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीने नगपरिषदस्तरावर महिला बचत गटांची स्थापना करण्यात येते.सदर गटांना व्यवसाय सुरु करणेस बँकेच्या माध्यमातून सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सुरु असलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने(पीएफएमई) अंतर्गत गटांना बीज भांडवल तसेच एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के व कमाल १० लाखापर्यंत “क्रेडीट लिंक्ड स्साबसिडी” आधारावर अनुदानाचा लाभ मिळतो.  पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ शहरासह ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घेता येतो. नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तरवृद्धी आधुनिकीकरणासाठी बँक संलग्नित अनुदान देण्याची तरतूद या योजनेत आहे.
सांगोला नगरपरिषदेच्या माध्यामतून धनश्री व श्री माऊली स्वयं. महिला बचत गटास  पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने(पीएफएमई) अंतर्गत अनुक्रमे र.रु. ३ लाख व र.रु. ३ लाख ६० हजार एवढे बीज भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये धनश्री महिला बचत गट हा उन्हाळी खाद्य पदार्थ तसेच पापड या गोष्टींचा व्यवसाय करतो. व श्री माऊली बचत गट शेवया उत्पादन व विक्री करतो. सदर गटांना नगपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांचे हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी धनश्री व श्री माऊली बचत गटाच्या अध्यक्षा सारिका दिनेश सावळे,सचिव सौ.मंगल ज्ञानदेव धांडोरे,सौ.अनिता प्रशांत धांडोरे, सौ.जयश्री अर्जुन लगड, सौ.सरुबाई अर्जुन लगड इ सदस्य तसेच या योजनेचे काम पाहणारे श्री. योगेश गंगाधरे, सहा. प्रकल्प अधिकारी व श्री. बिराप्पा हाके, समुदाय संघटक हे उपस्थित होते.

 

सांगोला शहरातील नगरपरिषदे अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बऱ्याच बचत गटातील महिला या आज विविध व्यवसायाच्या माध्यामतून आपल्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभे राहत आहेत.  पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने(पीएफएमई) अंतर्गत ज्या कोणा वैयक्तिक अथवा बचत गटांना “क्रेडीट लिंक्ड स्साबसिडी” आधारावर अनुदानाचा लाभ घ्यावयाचा आहे, अशांनी दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्ष, नगरपरिषद येथे संपर्क साधावा.
-डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी, नगरपरिषद सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!