श्रीराम महिला भजनी मंडळाचा यशाचा चढता आलेख

शुक्रवार दिनांक 2/ 6 /2023 रोजी माधवनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या महिला भजन स्पर्धेमध्ये श्रीराम महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त करून आपल्या यशाचा चढता आलेख उंचावला आहे.
श्रीहरी हरिपाठ सत्संग सामाजिक व सांस्कृतिक मंडळ ट्रस्ट यांनी मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये 18 संघांनी सहभाग घेतला होता. सूर ,ताल ,लय, सांघिक मेळ या सर्व निकषावर प्राध्यापक विलास वांगीकर यांनी स्थापन केलेल्या श्रीराम महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त करून सांगोला तालुक्याचे नाव उज्वल केलेले आहे.
वरील स्पर्धेमध्ये शुभांगी कवठेकर ,सुरेखा वांगीकर, विजया देशपांडे, शिला झपके ,ज्योती दौंडे, मंगल कांबळे या सदस्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये हार्मोनियम ची साथ मंडळाला वेळोवेळी सहाय्य व मार्गदर्शन करणारे श्री. शशिकांत दादा लाटणे यांनी केली व तबल्याची उत्तम साथ कुमारी पौर्णिमा गोडसे हिने केली.
श्रीराम महिला भजनी मंडळाच्या या यशाची सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.