जवळा ग्रामपंचायत कार्यालय फोडले चोरट्यांनी
सांगोला(प्रतिनिधी):- ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करुन लाकडी टेबल, एक खुर्ची व सीसीटीव्ही चा डिव्हीआर इत्यादी 13 हजार रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने दि. 09/02/2024 रोजी रात्रीच्या सुमारास पळवून नेली असल्याची घटना जवळा ता.सांगोला येथे घडली. यापुर्वी काही महिन्यापुर्वीच हे ग्रामपंचायत कार्यालय फोडले होते.
सज्जन गायकवाड (रा. जवळा ता. सांगोला जि.सोलापूर) यांची चोरीची फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी 4 हजार रुपये किंमतीचा एक लाकडी टेबल, 3 हजार रुपये किंमतीची एक गोलाकार व्हिलची खुर्ची व 6 हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्हीचा डिव्हीआर आदी साहित्य लंपास केले आहे.
फिर्यादी सज्जन गायकवाड हे क्लार्क म्हणून जवळा ग्रामपंचायत कार्यालय जवळा या ठिकाणी 2006 पासून कार्यरत आहेत. दि. 09 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय जवळा या ठिकाणी येवून दिवसभर ग्रामपंचायत कार्यालयात काम करून सांयकाळी 6 वा. चे सुमारास कार्यालय बंद करून घरी गेले. त्यानंतर दि.10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता गायकवाड यांचे मोबाईल नंबर वरती ग्रामपंचायतचे शिपाई जयश्री वासते यांचा मुलगा समाधान वासते यांनी सांगितले की, जवळा ग्रामपंचायत कार्यालयाचे बाहेरील दरवाजाचे कुलप तोडलेले दिसत आहे. तेव्हा गायकवाड यांनी त्यास आत मध्ये जावून पाहा असे सांगितले. आत मध्ये जावून पाहून त्याने सांगितले की, कार्यालयातील लाकडी टेबल, गोल आकाराची खुचीं व सीसीसीटीव्हीचा डिव्हीआर इत्यादी साहित्य नसल्याचे संगितले होते. त्यानंतर सुमारे सकाळी 09.30 वा. चे सुमारास गायकवाड हे ग्रामपंचायत कार्यालय जवळा या ठिकाणी गेलो त्यावेळी गावचे पोलीस पाटील हे पण सोबत होते. तेव्हा समोरील दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले आत मध्ये जावून पाहीले असता 13 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरीस गेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.