पाचगणी येथून भरकटलेले पॅरास्लाइडिंग उतरले इटकीत; फ्रान्सचा पर्यटक सुखरूप.
सांगोला:- फ्रान्सचे अनेक पर्यटक पाचगणी महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आले होते. काल शुक्रवारी पॅरास्लाइडिंग खेळाचा आनंद घेत असताना आकाशात उंच भरारी घेतलेले पॅरास्लाइडिंग भरकटले आणि थेट पॅरास्लाइडिंग स्वराला घेवून इटकी ता. सांगोला येथे सायं साडेपाच वाजण्याच्या सुमारास काळे यांच्या शेतात अचानक उतरले.
अचानक उतरलेले पॅरास्लाइडिंग पाहण्यासाठी काही वेळातच इटकी येथील ग्रामस्थांनी गर्दी केली.पॅरास्लाइडिंग आणि विदेशी पर्यटकांला पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली. ही बातमी पसरताच गावातील अशोक चव्हाण, धर्मराज करचे, तंटामुक्त अध्यक्ष लखन खांडेकर यांनी विदेशी पर्यटकांची आस्थेने चौकशी केली.
विदेशी पर्यटक इंग्रजी भाषा बोलत असल्याने कुठून आला? तसेच इतर माहिती जाणून घेण्यास अडचणी आल्या. यावेळी काही नागरिकांनी सदर घटना सांगताच विदेशी पर्यटकांची चौकशी करून पाचगणी महाबळेश्वर येथे सोडण्यासाठी गावातील काही तरुण गेले आहेत.
चौकट: विदेशी पर्यटकांशी इंग्रजीतून संभाषण केले असता ते फ्रान्स देशातील असल्याचे सांगितले. प्रालेक्साना साक्री असल्याचे सांगितले. तसेच पॅरास्लाइडिंग शिक्षक असल्याचे सांगून महाराष्ट्र अतिशय ग्रेट आणि इथली संस्कृती नावीन्यपूर्ण असल्याचे विदेशी पर्यटकांने सांगितले.