महाराष्ट्र

सांगोला फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश प्रकिया मार्गदर्शन केंद्र सुरू

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ इंजिनिअरिंग प्रवेशासाठी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे यांनी दिली.

फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित, फॅबटेक काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला येथे शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ रोजी प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब रूपनर यांचे हस्ते करण्यात आले.
अभियांञिकी प्रवेशासंदर्भात
फॅबटेक महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले असून या मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षासाठी आवश्यक असणारी महत्त्वाचे कागदपत्रे तसेच ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरणे, अर्जाची पडताळणी करणे आणि अर्ज कायम करणे या संदर्भात सर्व माहिती मोफत देण्यात येणार आहे.

सांगोला फॅबटेक इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्पुटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व ए.आय. अ‍ॅण्ड डेटा सायन्स आदी शाखा उपलब्ध आहेत.
या शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात आता सद्यस्थितीत व भविष्यात मोठ्या संख्येने नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
अभियांञिकीचे शिक्षण घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी महाविद्यालयाच्या मार्गदर्शन केंद्राला भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी ८४०८८८८६५७, ८४०८८८८५०४ या नंबर वरती संपर्क साधण्याचे आवाहन अ‍ॅडमिशन समन्वय प्रा. राजकुमार गावडे यांनी केले आहे.

यादरम्यान फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, उप प्राचार्या प्रा. डॉ. विद्याराणी क्षीरसागर आदींसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button