महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिरची संस्कृती बेहेरे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

सांगोला (प्रतिनिधी) तांदुळवाडी ता.माळशिरस येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेची संस्कृती भाग्यवंत बेहेरे हिने पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक पटकाविला. तिने “घरोघरी मोबाईलच्या चुली” या विषयांवर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. तिला रोख रक्कम १५०० रु., प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच स्वर्गीय आमदार डॉ.गणपतराव देशमुख यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व विज्ञान महाविद्यालय सांगोला यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतही संस्कृती भाग्यवंत बेहेरे हिने पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक पटकाविला. तिने “स्व.आमदार डॉ.गणपतराव देशमुख यांचे सामाजिक कार्य” या विषयावर प्रभावी विचार व्यक्त केले.
वक्तृत्व स्पर्धांमधील या यशाबद्दल संस्कृतीचा संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी सत्कार करून अभिनंदन केले.तिला वाड:मय विभागप्रमुख उन्मेष आटपाडीकर, प्रशांत रायचुरे, शैलजा झपके, उमेश नष्टे, संध्या तेली, दत्तात्रय पाटील, श्रीकृष्ण वाघमारे, स्वाती चांदणे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
कु.संस्कृतीसह तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारणी सदस्य विश्वेशजी झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरूटे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.



