महाराष्ट्र

सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी. फार्मसीमधील अंतिम वर्षाचा निरोप समारंभ संपन्न

सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या  डी. फार्मसीमधील अंतिम वर्षाचा निरोप समारंभ पार पडला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर व प्रमुख अतिथी  डॉ. सयाजी गायकवाड, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर हे उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर,  डॉ. सयाजी गायकवाड , परिसर संचालक डॉ. संजय आदाटे यांनी विद्याथ्यांना मार्गदर्शन केले तसेच आरोग्यविषयी माहिती देण्यात आली आणि एड्स संबंधी मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले  व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डी.  फार्मसीच्या विभागप्रमुख प्रा. अश्विनी झाडे, कार्यक्रम नियोजन -प्रमुख प्रा.  वैष्णवी कदम व प्रा.ए.बी. पिंजारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रुपनर कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर व्यवस्थापक प्रतिनिधी  मा. प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय  अदाटे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button