सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील प्रात्यक्षिक परीक्षेस भरारी पथकाची भेट

सांगोला(प्रतिनिधी):- पुणे विभागीय शिक्षण मंडळामार्फत 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ह्या दिनांक 2 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचे सूचित केले आहे. या अनुषंगाने न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये विज्ञान व संलग्नित विषयाच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा दिनांक 2 फेब्रुवारी पासून सुरू आहेत.

दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स या विषयाच्या दुपार सत्रातील प्रात्यक्षिक परीक्षेस पुणे विभागीय शिक्षण मंडळ, उच्च माध्यमिक प्रात्यक्षिक परीक्षा – भरारी पथक प्रमुख सौ सुलभा वठारे मॅडम (जिल्हा शिक्षण अधिकारी – योजना विभाग ) यांनी भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षे संदर्भात काही समस्या असतील तर त्या सांगाव्यात अशी विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी कोणतीही समस्या नाही, असे सांगितले. याबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षेसाठी जिल्ह्यातील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या कॉलेजमध्ये या कॉलेजची गणना होती, तरी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पुरेसे साहित्य पाहून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाविषयी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य हेमंत आदलिंगे, भौतिकशास्त्र विषय – बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत परीक्षक प्रा.देवेन लवटे व प्रा. सौ. श्रद्धा देशमुखे मॅडम, बहिस्थ परीक्षक प्रा.कदम एस. व्ही., व प्रा भंडारे एस डी. तर इलेक्ट्रॉनिक्स विषय अंतर्गत परीक्षक पंचशीला सोनटक्के मॅडम, व बहिस्थ परीक्षक केंगार प्रशांत सर, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा बोराडे एन. व्ही., प्रा. सिमा कांबळे मॅडम, प्रा. गेळे मॅडम, प्रा. जाधव मॅडम, व आबा व्हटे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!