सांगोला तालुका

सावे माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक क्षेत्रभेट उत्साहात संपन्न.

 

सावे माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक क्षेत्रभेट दिनांक 18 -9- 2023 रोजी सकाळी सहा वाजता शाहू पॅलेस कोल्हापूर पाहण्यासाठी रवाना झाली. सावे गावचे सुपुत्र, दानशूर,शिक्षणप्रेमी व विद्यार्थीप्रिय  श्री जनार्दन चांदणे साहेब यांच्या प्रेरणेतून छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य हे शाहू पॅलेस पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक समजेल या उद्देशाने त्यांच्या वतीने या क्षेत्रभेटीचे नियोजन केले होते व या क्षेत्रभेटीचा संपूर्ण खर्च त्यांनी स्वतः केला.

सर्वप्रथम सकाळी ठीक अकरा वाजून तीस मिनिटांनी कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर श्री महालक्ष्मी दर्शन घेतले. त्यानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ऐतिहासिक जुना शाहू पॅलेस पाहिले व भवानी मंदिरामध्ये दर्शन घेतले तसेच त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक वास्तू पाहावयास मिळाल्या .त्यानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी शाहू पॅलेस या ठिकाणी असलेल्या निसर्गरम्य बगीचामध्ये भोजनाचा आनंद घेतला त्यानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी एका रांगेमध्ये जाऊन शाहू पॅलेस मधील वेगवेगळी शस्त्रास्त्रे ,राजघराण्याच्या वंशावळीतून राजांचा इतिहास समजून घेतला. छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या पशुपक्ष्यांच्या शिकारी व तेथील दरबार हॉल व आसन व्यवस्था हे पाहण्यात आले. तसेच या पॅलेस मधील वस्तू संग्रहालय पाहण्यासारखे होते .जुन्या काळातील नाणी ,पोस्ट तिकिटे, शस्त्रे, पोषाख इत्यादी विद्यार्थ्यांना पहावयास मिळाले.

विविध जंगली प्राणी व पक्षी पहावयास मिळाली .तसेच प्राण्याच्या व पक्ष्यांच्या नखापासून व खुरापासून बनवलेल्या वस्तू बघितल्या. तसेच शाहू महाराजांच्या काळातील कुत्र्याकडून जंगली अस्वल व वाघांची केलेली शिकार विद्यार्थ्यांना पहावयास मिळाली .अशा पद्धतीने दिवसभर या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांनी अतिशय मनमुरादपणे आनंद घेतला व शाहू महाराजांच्या कार्याची माहिती शाहू पॅलेस पाहिल्यानंतर मिळाली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता या क्षेत्रभेटीचा परतीचा प्रवास सुरू झाला .संध्याकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी विद्यालयामध्ये दाखल झाले

.अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी हसत खेळत ,मौज मजा करत, आनंदाने या क्षेत्रभेटीचा अभ्यास जाणून घेतला .या शैक्षणिक क्षेत्रभेटीचा संपूर्ण खर्च सावे गावचे सुपुत्र व सरावली ग्रामपंचायत जिल्हा पालघर चे विद्यमान सरपंच मा.श्री जनार्दन विठ्ठल चांदणे साहेब यांनी केला त्याबद्दल त्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना धन्यवाद देऊन आभार मानले . सदर शैक्षणिक क्षेत्र भेटीसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्षेत्रभेट संपन्न झाली. तसेच ही क्षेत्रभेट पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!