शैक्षणिकसांगोला तालुका

कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृतीसमारोह निमित्त राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेस उद्यापासून सुरुवात

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी, सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सुविधा सर्वप्रथम प्रदान करणारे शिक्षणमहर्षि व सांगोला, नाझरा, कोळा विद्यामंदिर प्रशालेचे जनक कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके 42 वा स्मृतीसमारोह 2023 विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी दिली.
यामध्ये दि.8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2023 रोजी पुरुषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी विविध भागातून आतापर्यंत 26 संघांनी सहभाग नोंदविला आहे.
या स्पधेर्र्चे उद्घाटन पी.एन.जी. ज्वेलर्स पुणे उपाध्यक्ष अमित वैद्य यांचे शुभहस्ते व प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली व महा. बास्केटबॉल असो.अध्यक्ष धनंजय वेलूकर, खजिनदार जयंत देशमुख यांचे उपस्थितीत शुक्रवार दि.8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 10 वा. सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे संपन्न होणार आहे. तसेच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 10 सप्टेंबर रोजी सायं. 5 वा. क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य संजय बनसोडे यांचे शुभहस्ते व बसवराज पाटील, नागराळकर उदगीर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्योगपती सिद्धार्थ झपके, विलास क्षीरसागर, सुहास होनराव, ज्ञानेश्वर तेली, नागेश तेली, मंगेश म्हमाणे, रत्नाकर ठोंबरे यांची उपस्थिती आहे.
तसेच शुक्रवार दि.16 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.00 वा समाधी दर्शन व 8.00 वा. सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे तैलचित्र पुष्पहार अर्पण व 4.00 वाजता कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह सांगता समारंभ प्रमुख पाहुणे यजुर्वेद महाजन प्रसिद्ध वक्ते, संस्थापक दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव यांचे शुभहस्ते व प्रा. प्रबुद्धचंद्र झपके याचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या समारंभामध्ये कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण होणार आहे.

कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या स्मृतीसमारोह निमित 12 सप्टेंबर 2023 रोजी 5 वी ते 7 वी गट तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व 13 सप्टेंबर 2023 रोजी 8 वी ते 10 व 11 वी 12 गट जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार आहेत. या संदर्भात जिल्हयातील शाळांना निमंत्रण पत्रिका पोस्टाने पाठवली आहे. अधिक माहितीसाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या संस्थेच्या www.stspm.org या वेबसाईटला भेट द्यावी व जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!