नगर वाचन मंदिर, सांगोला अध्यक्षपदी प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांची निवड

शनिवार दिनांक 24 जून 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता नगर वाचन मंदिर सांगोला ची वार्षिक सभा संस्थेच्या अभ्यासिका हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीस संस्था सेक्रेटरी श्री मिलिंद फाळके यांनी प्रास्ताविक व स्वागत करून सभेच्या कामकाजातील सर्व विषयांचे वाचन करून ठराव संमत करण्यात आले.
तसेच या वार्षिक सभेमध्ये सन 2023 ते 2028 या सालाकरिता पदाधिकारी व कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये श्री प्रबुद्धचंद्र झपके यांची अध्यक्ष, श्री डॉ. प्रभाकर माळी यांची उपाध्यक्ष, श्री मिलिंद फाळके सेक्रेटरी, श्री शंकर सावंत यांची सह सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली. तसेच कार्यकारणी सदस्य यासाठी संजीव नाकील, अब्दुल गणी सय्यद, किशोर बनसोडे, भीमाशंकर पैलवान, दादा खडतरे, अमर गुळमिरे, शिवशंकर तटाळे, नरेंद्र होनराव, सौ शुभांगी घोंगडे, सौ विद्या नरुटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर वार्षिक सभेचे कामकाजाची सांगता श्री शंकर सावंत यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.