सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिकल स्कूलचे न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेत सुयश

ब्रिलियंट पब्लिकेशन यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षा (2022-23) यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेमध्ये इ.2री ते 8वीतील 33विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.यामध्ये इ. 8वी तील कु.वैष्णवी विनोद खंदारे,कु.प्रिया बाळासाहेब इंगोले,कु.अवधूत उमेश डबीर,कु.अरमान अमुलाल सुतार या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे मॅडम व पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु.रोहिणी महारनवर यांच्या हस्ते बक्षीसवाटप करण्यात आले.
रोख रक्कम,मेडल व प्रशस्तीपत्र असे बक्षीसाचे स्वरूप होते.या विद्यार्थ्यांना कु. दिपाली बसवदे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर, सचिव श्री.म.शं.घोंगडे सर, सहसचिव श्री.प्रशुध्दचंद्र झपके साहेब, खजिनदार श्री. शं. बा. सावंत , कार्यकारिणी सदस्य श्री.विश्वेश झपके तसेच सर्व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.