गणित प्रज्ञा परीक्षेत सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचे यश

महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ यांचेवतीने घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमधील इ.8वीतील कु. अरमान अमुलाल सुतार याने सुयश प्राप्त केले. या परीक्षेत त्याला (Silver Catogary) प्रमाणपत्र मिळाले व तो राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरला आहे.अरमान सुतार हा सांगोला तालुक्यातील इंग्लिश मेडिअम स्कूलमधून हे यश प्राप्त करणारा एकमेव विद्यार्थी आहे.
या यशाबद्दल सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळाच्या वतीने तसेच सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये त्याचा सत्कार संपन्न झाला.
या विद्यार्थ्यास विद्यालयाच्या सहशिक्षिका कु.आरती फुले व श्री.प्रशांत बुरांडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर, सचिव श्री.म.शं.घोंगडे सर, सहसचिव श्री.प्रशुध्दचंद्र झपके साहेब, खजिनदार श्री. शं. बा. सावंत , कार्यकारिणी सदस्य श्री.विश्वेश झपके,सर्व संस्थासदस्य तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सरीता कापसे मॅडम यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.