चोपडी चे शरद बाबर (शेठ)  यांच्या वाढदिवसानिमित्त राधेश्याम वृद्धाश्रम बलवडी येथे धान्य वाटप

नाझरा( वार्ताहर):-  चोपडी गावचे सुपुत्र व व्यापारी कलकत्ता मानव कल्याण संस्थेचे सदस्य शरद समाधान बाबर(शेठ)य त्यांच्या वाढदिवसा निमित्त आज गोडवाडी,चोपडी येथे मराठी शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. यामध्ये वही,पेन तसेच चित्रकला वही,रंगपेटी असे साहित्य त्यांचे वडील मा.समाधान तात्या, बंधू आबासाहेब बाबर यांचे हस्ते देण्यात आले.
शरद बाबर मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून गरीब विद्यार्थ्यांना व वृद्धाश्रमांना मदत करण्यात आली. आपल्या वाढदिवसाचा कसलाही डामडोल न करता आपला वाढदिवस गरिबांच्या गरजा पूर्ण करण्यात जावा ही भावना निश्चितपणे समाजाच्या उन्नत विचारांची प्रगल्भता आहे.
  महादेव दादा आलदर, खरेदी-विक्री संघ संचालक, पोपट (दादा) गडदे, सोपान शिंगाडे,माजी सरपंच, माणिकराव सकट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ गडदे. नारायण बापू शेंडगे. सरपंच महेश माळी. युवा नेते विजय माळी. प्रगतशील बागायतदार आप्पासो माळी. डेपोडी सरपंच राजू गुळीग. मेजर उज्वल गुळीग. इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री.केंगार सर यांनी आपले विचार मांडले व दानशूरपणाबद्दल बोलले. गणेश नगर येथील शाळेत विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी समाधान तात्याबाबत आबासाहेब बाबर त्याचबरोबर मुख्याध्यापक राजू बनसोडे सहशिक्षिका रूपाली पवार अधिक उपस्थित होते.
 पांढरे सरांनी आभार प्रदर्शन केले.चहापान व खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button