सांगोला विद्यामंदिरमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

सांगोला (प्रतिनिधी ) :-कृषी, सहकार, उद्योग या क्षेत्रांच्या विकासासाठी दूरदृष्टीने प्रकल्प, योजना राबविणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे सां.ता.शि.प्र.मंडळ सांगोला सचिव म.शं. घोंगडे यांचे हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.