सांगोला तालुका

संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा; सूर्योदयचे फाउंडेशनचे कार्य तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी- मा. आ. दीपकआबा साळुंखे पाटील

सांगोला(प्रतिनिधी):-संपूर्ण सोलापूर जिल्हा तसेच महाराष्ट्र व कर्नाटकचे कार्यक्षेत्र नजरेसमोर ठेवून कार्यरत असलेला सूर्योदय उद्योग समूह आणि एल के पी मल्टीस्टेट परिवार आहे. या उद्योग समूहांने अनेक उद्योग आणि व्यवसायांबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील जपण्यासाठी उभा केलेल्या सूर्योदय फाउंडेशनचे कार्य तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.

या उद्योग समूहाचे आणि सूर्योदय फाउंडेशन चे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. सूर्योदयाच्या माध्यमातून कार्यरत असलेले अनिलभाऊ इंगवले, जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ. बंडोपंत लवटे व सुभाष दिघे गुरुजी या मंडळींना गेल्या 25 30 वर्षापासून मी पाहत आलो आहे. कुठल्याही प्रकारची औद्योगिक पार्श्वभूमी नसताना जिद्द ,चिकाटी आणि कष्ट व धडपड या जोरावरच या मंडळींनी आज महाराष्ट्राच्या नजरेत भरेल अशा पद्धतीचे काम उभा केलेले दिसत आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देखील एल के पी मल्टीस्टेटच्या माध्यमातून शाखा उभारण्याची मोहीम आखली जात आहे. वृक्षारोपण , रक्तदान शिबिर त्याचबरोबर सेवाभावी संस्थांना मदत अशा लोकोपयोगी उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करत सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी जपण्याचं काम या सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून उभे राहत असल्याचाही भावना यावेळी बोलताना दीपकआबांनी व्यक्त केल्या.

सकाळी मेडशिंगी येथील सूर्योदय दूध प्लांट नजीकच्या रस्त्याकडे ला काही वृक्षांचे रोपण करण्यात आले. माझ्या परिघात सेवा समूह या सेवाभावी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सांगोला येथे सूर्योदय अर्बनच्या इमारतीमध्ये सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्यामुळे तब्बल 231 रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला . सांगोला येथील रेवेनिल ब्लड बँकेच्या टीमने या शिबिराची उत्तम कामगिरी पार पाडली.
या वाढदिवस समारंभासाठी सांगोल्याचे लोकप्रिय आमदार एड. शहाजीबापू पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, फॅबटेक चे प्रमुख भाऊसाहेब रुपनर, भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, युवक नेते गुंडादादा खटकाळे, संभाजी ब्रिगेडचे अरविंदभाऊ केदार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजि.रमेश जाधव, सुवर्णरत्न मल्टीस्टेटचे महादेव बिराजदार, समर्थ हॉस्पिटलचे डॉ. विजयकुमार इंगवले, शोभाश्री परिवाराचे किरण पुजारी, मेडशिंगीचे सरपंच प्रतापसिंह इंगवले, दहिवडीचे सरपंच प्रकाश जूंधळे, माजी सरपंच विजयसिंह इंगवले, उद्योजक बबनभाऊ इंगवले , उद्योजक किरणभाऊ पांढरे महादेव दिघे सर, संजय साळुंखे ,अक्षय पवार, अवधूत वाघमोडे यांच्यासह असंख्य मान्यवरांनी दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव केला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय उद्योगसमूहातील सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!