सांगोला तालुका

चोपडी येथील नामदेव जवंजाळ यांचे अपघाती निधन

नाझरा(वार्ताहर):-  तालुक्यातील चोपडी येथील नामदेव महादेव जवंजाळ (वय 55) यांचे मंगळवारी सकाळी नाझरा येथील बेलवण पुलावरती अपघाती निधन झाले.
मंगळवारी सकाळी ते कामानिमित्त मोटरसायकल वरून निघाले असताना बेलवण पुलाजवळ त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना सांगोला येथील प्राथमिक आरोग्यंद्रात नेण्यात आले तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सदर घटनेची नोंद सांगोला पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून या घटनेचा अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.  मितभाषी स्वभावाने ते सर्वांना परिचित होते,त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.
मंगळवारी दुपारी चोपडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवारी सकाळी 7.30 वा. चोपडी येथील  स्मशानभूमीत असल्याचे नातेवाईकांकडून समजते.त्यांच्या जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!