प्रा.लक्ष्मण हाके यांच्या मूळ गावी जुजारपूर येथे फटाके फोडून आनंदोत्सव
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकारकडून आश्वासन मिळल्यानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित!

सांगोला(प्रतिनिधी):- ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकारकडून आश्वासन मिळल्यानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित केल्यानंतर सांगोला तालुका ओबीसीच्यावतीने त्यांच्या मूळ गावी जुजारपूर येथे फटाके फोडून वडिल सोपान पांडुरंग हाके ,आई शालन सोपान हाके, पत्नी चंगुबाई माने, भाऊ सदाशिव सोपान हाके यांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या 10 दिवसांपासून ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ केलेले उपोषण लक्ष्मण हाके यांनी स्थगित केले आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्री होते. त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित केले.शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत दोन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सरकारने पटवून दिल्याने उपोषण स्थगित करत असल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.
यावेळी, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, शिवाजीनाना बनकर, उल्हास धायगुडे-पाटील, अमोल खरात, आनंदा मेटकरी, बाळराजे तंडे, दत्ता लोखंडे, तानाजी खंडागळे, महेश बनकर, अंकुश वाघमोडे, शंकर हिप्परकर, बिरु बजबळकर, अमोल बजबळकर, राहुल बजबळकर, दादा माने, महादेव हिप्परकर, मोहन बजबळकर, रामचंद्र हाके, जालिंदर लोखंडे, नामदेव लोखंडे, गणेश बजबळकर, धनाजी बजबळकर, सागर पाटील, सचिन शेळके, श्रीकांत तंडे, स्वप्नील पाटील, लखन व्हनमाने, सागर व्हनमाने, रघुनाथ व्हनमाने, समाधान रुपनर, वसंत लोखंडे, मारुती लोखंडे यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सरकारने पटवून दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आलेमुळे फटाक्यांची आतिषबाजी करुन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. सांगोला तालुक्यासह जुजारपूर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र मोठा जल्लोष करण्यात आला.