नाझरा विद्या मंदिर मध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा

नाझरा(वार्ताहर):- थोर गणिती तज्ञ रामानुजन यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून जागतिक गणित दिवस नाझरा विद्यामंदिर प्रशालेत साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यामंदिर परिवारातील ज्येष्ठ गणित शिक्षक विनायक पाटील,वसंत गोडसे, दिलावर नदाफ,प्रा. नारायण पाटील, प्रा. सुशांत बागल यांच्या हस्ते गणिती तज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्याचबरोबर कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य अमोल गायकवाड,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या गणित संबोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी जान्हवी प्रकाश कांबळे, सौरभ नंदू आदाटे, तुकाराम राजाराम वाघमारे,ऐश्वर्या ज्ञानेश्वर पांढरे,केदार मदन रायचूरे, विघ्नेश दादासाहेब शितोळे,प्रतीक्षा शंकर बंडगर,किरण भारत बंडगर,गौरी गणेश दिघे, पवनराजे दिगंबर शिंगाडे,हिम्मत नवनाथ शिंगाडे ,ओमराजे सतीश कारंडे या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गणित शिक्षक दिनावर नदाफ यांनी रामानुजन यांच्या जीवनातील विविध प्रसंग विस्तृतपणे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.