योजनांच्या प्रदर्शनाची ग्रामीण भागात खरी गरज : भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत; अलोट प्रतिसादांने झाली समृद्ध महाराष्ट्र प्रदर्शनाची सांगता

सांगोला (प्रतिनिधी) : खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला येथील रामकृष्ण व्हिला येथे भरलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे “समृद्ध महाराष्ट्र २०२३” या प्रदर्शनाची शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेल्या तीन दिवसांपासून रंगलेल्या या प्रदर्शनाला १५ हजारांहुन अधिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांनी भेट दिली. अपूर्व प्रतिसादात सांगता झालेल्या या सोहळयाला फलटणचे अमरसिंह नाईक-निंबाळकर, पोलिस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड़, तहसीलदार संजय खडतरे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, जयकुमार शिंदे, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, शिवाजीराव गायकवाड, आनंद फाटे, विजय बाबर, वसंत सुपेकर, एम.आर. गायकवाड, प्रमुख अतिथि उपस्थित होते.
       आतापर्यंत फक्त महानगरामध्ये होणारे प्रदर्शन हे प्रथमच सांगोला सारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागांनी सहभाग घेतला होता. भारतीय रिझर्व बॅंक, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ओएनजीसी, मेडिकल रिसर्च कॉन्सिल ऑफ इंडिया, भारतीय मानक ब्युरो, जलशक्ती मंत्रालय यासारख्या विविध 38 विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित माहिती नागरिकांना दिली.
यावेळी विविध स्टॉल धारकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्टेट पार्टनर म्हणून गवर्नमेंट ऑफ ओडिसा, बेस्ट स्टॉल अवेरनेश: बीआईएस. बेस्ट स्टॉल ऑइल अँड नेचरल गैस: ओएनजीसी. बेस्ट स्टॉल इन फाइनांसियल एजुकेशन: आरबीआई. बेस्ट स्टॉल इन माइनिंग: जीओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. बेस्ट स्टॉल इन मेडिकल रिसर्च: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. बेस्ट स्टॉल इन माइक्रो स्मॉल  अँड मीडियम इंटरप्राइजेस : केव्ही आईसी और क्वायर बोर्ड. बेस्ट स्टॉल इन रिसर्च  अँड डेवहलपमेंट : डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जी बेस्ट स्टॉल इन मैप मेकिंग एंड सर्व्हे: सर्व्हे ऑफ इंडिया अँड नेटमो. बेस्ट स्टॉल इन आटमोस्पियरिक साइंसेस : मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायंसेस.
प्रारंभी भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी प्रास्ताविक करताना शासकीय योजनांच्या प्रदर्शनाची ग्रामीण भागात खरी गरज असल्याचे सांगितले. यानंतर जयकुमार शिंदे, डिवाइएसपी विक्रांत गायकवाड आणि अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी राजू शिंदे आणि बंडू पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
सांगोल्यातील स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रयोगांनी लक्षले वेध; फॅबटेक आणि शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजने जिंकली पारितोषिके !
या प्रदर्शनात सांगोल्यातील स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधित केलेल्या आपल्या प्रयोगाचे सादरीकरणही करण्यात आले. यात फैबटैक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी बनविलेल्या  सोलर मल्टीपर्पज अग्रीकल्चर मशीमला प्रथम पारितोषिक, संगोल्याच्या चात्रपाती शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजक्या एडवांस शुगर केन अरधींग मशीनला द्वितीय क्रमांक तर फैबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ब्लाइंड कैप  या उपक्रमाला तिसरा क्रमांक देऊन गौरविण्यात आले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button