इनरव्हील क्लब ऑफ सांगोला तर्फे सूतगिरणीवर वृक्षारोपण.

इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांचे तर्फे डॉक्टर गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित सांगोला येथे भव्य वृक्षारोपण करण्यात आले. क्लब तर्फे सूतगिरणीवर जवळजवळ १२५ वृक्ष लावून सूतगिरणीच्या सौंदर्यात आणखी भर टाकण्याचा प्रयत्न इनर व्हील क्लब ने केला आहे.
वृक्षारोपण मध्ये कडुलिंब, करंज ,चिंच ,निलगिरी ,व गुलमोहर ,यांच्यासहित फुलांमध्ये ही मोगरा ,रातरानी, जास्वंद, जाई ,जुई ,अशा अनेक झाडांचा समावेश होता.
या वृक्षारोपण साठी इनरव्हील क्लब ला नगरपालिकेतील सेवानिवृत्त श्री संजय जी दौंडे साहेब व आदरणीय डॉक्टर प्रभाकर माळी नाना यांचे झाडे देण्यासाठी मोलाचे योगदान लाभले. वृक्षारोपण करतेवेळी सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी नाना, तसेच व्हाईस चेअरमन एडवोकेट गव्हाणे साहेब, व इतरही अधिकारी वर्ग ,आणि कामगार वर्ग उपस्थित होते. तर इनरव्हील क्लब च्या वतीने अध्यक्ष सौ. सविता लाटणे, मंगल लाटणे, प्रतिमा माळी ,माधुरी गुळमीरे, कविता दिवटे ,सुशीला नांगरे ,व मीरा देशपांडे या हजर होत्या.