सांगोला तालुकाराजकीय

आरक्षण हा राजकारण करण्याचा विषय नसुन तो प्रगतीचा मार्ग आहे-डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख

सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून संपुर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.गावोगावी आरक्षण या विषयावरती चर्चा सुरू आहेत.गेले अनेक दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन अनेक आंदोलने झाली..मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून लाखोंचे मोर्चे काढले गेले ते ही अगदी शांततेने ..तरीही आरक्षणाचा विषय तसाच रेंगाळत पडला आहे.अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी आरक्षणासाठी लावली आहे.तरीही या प्रश्नावरती ठोस निर्णय सरकारने घेतला गेला नाही.

 

एकतर आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वजण बोलताना तर सकारात्मक बोलताना दिसतात मग ते मराठा असो,धनगर असो की आणखीन कोणत्याही समाजघटकांना आरक्षण मिळण्याचा विषय असो सर्व पक्षांतील नेते त्या सर्वांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी टाहो फोडताना दिसत आहेत..तरीही आरक्षण का मिळत नाही आरक्षण या विषयावरती सर्व जण सकारात्मक आहेत तर घोड कुठे पेंड खातय यांची चर्चा संपुर्ण राज्यात विविध माध्यमांतून होताना दिसत आहे.आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भाषणे ऐंकायला मिळतात.सर्व पक्ष आरक्षणाच्या बाजुने असल्याचे सांगतात.निर्णय मात्र होताना दिसत नाही.आशा वेळी ठोस निर्णय सरकारने घेणे गरजेचे असताना ते निर्णय घेतले जात नाहीत.
विरोधी पक्षात असले की,आरक्षण मिळालेच पाहिजे ते आमच्या हक्काचे आहे अशी भुमिका मांडायची व सत्तेत आले की ..बघु करु ती न्याय्य प्रविष्ठ गोष्ट आहे..समिती नेमली आहे..अहवाल यायचा आहे..वगैरे वगैरे उडवा उडविची उत्तरे ऐंकायला मिळतात..आशा वेळी सामांन्य नागरीक द्विधा मनस्थितीत वावरत असतो त्याला आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोणाकडे जायचे हे समजत नाही आशा वेळेस ते सर्व नागरीक आपल्या न्याय मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या मार्गाने आपले प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावरच्या लढाया लढण्यासाठी उतरतात ..अशीच एक‌ लढाई म्हणजे जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आहे..सदर आंदोलनादरम्यान काही दिवसांपूर्वी नागरीकांवरती अमानुष लाठी चार्ज करण्यात आला..त्या लाठी हल्ल्यामध्ये महिला सुध्दा गंभीर जखमी झाल्या.. त्यामुळे संपुर्ण राज्यांमध्ये सरकारविरोधी रोष निर्माण झाला आहे.

 

एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठीचे आश्वासन देताना .. त्या समाजाला आरक्षणाची आशा दाखवत असताना‌… त्या विषयाचा अभ्यास करुन गांभीर्याने तो विषय प्रथम स्वतः समजावून‌ घेऊन मगच त्या समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले पाहिजे ..अगदी कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन मगच निवडणुकीच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख केला पाहिजे..आसे केले तर लोकांचीही आपल्या प्रती विश्वासाहर्ता वाढेल . मात्र बहुतांश राजकीय पक्ष मागचा पुढचा विचार न करता मतांसाठी.. त्या समाजाला वारेमाप आश्वासने देतात तसाच प्रकार आरक्षणाच्या बाबतीत झालेला आहे.मग विरोधात असताना सत्तेतील पक्षाला अडचणीत आणण्यासाठी आसे विषय ताणुन धरायचे त्या आधारावर समाजाची सहानुभूती मिळवायची व त्याच सहानभूतीचे मतात रुपांतर करुन घेऊन सत्ता हस्तगत करायची व सत्ता आली की आरक्षणासारख्या विषयाचे भिजत घोंगडे ठेवायचे .. सत्तेतील पक्ष विरोधी बाजूला‌‌ गेले की यांनी तोच आरक्षणाचा विषय उचलुन धरायचा हा प्रकार जनतेच्या ही लक्षात आलेला आहे.
राजकारण हे समाज कारणाचे माध्यम आहे त्या माध्यमातून समाजाची सर्वांगीण प्रगती करायची असते मात्र काही लोक आरक्षणासारख्या जनतेच्या महत्वाच्या प्रश्नावरती राजकारण करताना दिसत आहेत.
राज्यातील काही भागात ओबीसी समाजाची सुध्दा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत त्यांनाही वारेमाप आश्वासने दिली गेली आहेत..काही समाजाला‌ तर सत्ता आल्यानंतर दहा दिवसांत आरक्षण देण्याच्या घोषणा झाल्या होत्या मात्र तो समाजही आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या पाहावयास मिळताना दिसत आहे..
राजकारण हे सध्या नको त्या थराला गेलेले आहे..हा प्रश्न सोडवायचा नसेल त्यांची इच्छा शक्तीच नसेल किंवा राजकीय अडचण निर्माण होणार आसेल तर आरक्षणा सारखे विषय मार्गी न लावता ..समाजा समाजामध्ये वाद निर्माण होतील..मतभेद निर्माण होतील व आरक्षण हा विषय रेंगाळत पडेल व लोकांचे लक्ष या प्रश्नांवरुन विचलीत करण्यासाठी सुध्दा जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील अशी शंका निर्माण झाली आहे.

 

राजकारण करीत आसताना आश्वासने देताना, शब्द देताना काळजी घेणे गरजेचे आहे.दिलेली आश्वासने पाळता येत असतील तरच तशी आश्वासने द्यावीत..व आरक्षणासारख्या महत्वाच्या विषयावरती सर्व पक्षाची व संघटनांचे एकमत करुन आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे..कारण आरक्षण हा राजकारण करण्याचा विषय नसुन तो एक प्रगतीचा मार्ग असल्याचे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!