मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अखंड मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथील मराठा समाजाच्या महामोर्चा संदर्भात पुर्व नियोजन बैठक आयोजित केलेली आहे. २९ ऑगस्ट रोजीच्या मुंबई महामोर्चाच्या पूर्व नियोजन व तयारीसाठी रविवार दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला मिरज रोड येथे पूर्वनियोजन बैठक आयोजित केली आहे. सकल मराठा समाजाच्या भविष्यासाठी या लढाईत सांगोला तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज सांगोला शहर व तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.
“एक मराठा, लाख मराठा” मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या महत्वपूर्व आंदोलनात एकजूटीने व बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज सांगोला शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.