अखिल महाराष्ट्र वारकरी समाज दिंडी प्रस्थान सोहळ्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या हस्ते पूजन
श्री. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी अखिल महाराष्ट्र वारकरी समाज दिंडी मार्गस्थ

श्री .विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारीचे हे 24 वे वर्ष असून अखिल महाराष्ट्र वारकरी समाज दिंडीचे सांगोला नगर परिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर या दिंडीने आळंदीकडे प्रस्थान केले .
या दिंडीमध्ये विठू माऊलीचे अनेक वारकरी भाविक भक्त , स्त्री – पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले. या दिंडीच्या निमित्ताने काकडा , हरिपाठ ,किर्तन ,प्रवचन ,भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत .शुक्रवार दिनांक 28 जून रोजी ही दिंडी आळंदीकडे मार्गस्थ झाली आहे. 28 जून ते 18 जुलै या कालावधीमध्ये महाराजांच्या पालखी सोहळ्यात, या दिंडीचा सहभाग आहे.
या दिंडी सोहळ्यामध्ये ह. भ .प लक्ष्मण निंबाळकर, माजी नगरसेवक अरुण काळे, आनंद सपाटे ,दिंडी चालक महादेव घाडगे, श्रीमती अलका भंडारे, खजिनदार कालिदास पाटील, किरण सपाटे यांच्यासह आदी भाविक भक्त वारकरी यांचा सहभाग आहे.