सांगोला विद्यामंदिरमध्ये प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा सत्कार संपन्न स्व.आम.गणपतराव देशमुख जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजन

सांगोला (प्रतिनिधी)
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब ३२३४ड-१ माजी प्रांतपाल, विद्यामंदिर शैक्षणिक संकुल, लायन्स क्लब ,महाराष्ट्र साहित्य परिषद, नगर वाचन मंदिर सांगोला या शाखांचे मार्गदर्शक एक प्रगल्भ व्यक्तिमत्व प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक ,राजकीय व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे शुभहस्ते स्व.आमदार गणपतराव देशमुख जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी, आंतरराष्ट्रीय लायन संघटना प्रांत ३२३४ड १ झोन ५ च्या वतीने झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी तर लायन्स क्लब सांगोलाच्या वतीने सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. उन्मेश आटपाडीकर, सचिव ला.अजिंक्य झपके, खजिनदार ला.नरेंद्र होनराव यांनी सत्कार केला.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव म.शं.घोंगडे, प्राचार्य गंगाधर घोंगडे ,उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते,उपप्राचार्य शहिदा सय्यद पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने उपस्थित होते.
यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशाला वैभव कोठावळे, नरेंद्र होनराव, ज्युनिअर कॉलेज शिवशंकर तटाळे यांचा तर ज्युनिअर कॉलेजचे प्रा.धनाजी चव्हाण यांना लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. शिवशंकर तटाळे यांनी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके ४२वा स्मृतीसमारोह सांगता समारंभामध्ये सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेकडून दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार आम्हाला मिळाला हे आमचे भाग्य आहे. यासाठी संस्थेचे मन:पूर्वक आभार मानले व या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन यापुढेही निष्ठेने कार्य करण्याचा आमचा मानस आहे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व लायन्स क्लब ऑफ सांगोला पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हाती घेतलेल्या कामावरील अढळ निष्ठा नेहमी यशाचंच फळ देते. या निष्ठेतूनच प्रत्येकाला आपल्या ध्येयाशी सहज एकरूप होता येते. हा विचार प्रमाण मानून आपण यापुढेही कार्य करूया.त्यातूनच शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्र श्रेष्ठ पदाला जाईल.जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण सर्व सर्वांनी अतिशय आत्मीयतेने माझा सत्कार केला.यासाठी धन्यवाद..
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके
अध्यक्ष सां.ता.शि.प्र.मंडळ, सांगोला