महाराष्ट्र

अखेर नलवडेवाडीच्या रस्त्याच्या कामाला मुहुर्त

पाचेगांव खुर्द/प्रशांत मिसाळः

गेल्या अनेक वर्शापासुन प्रलंबित असणारा पाचेगांव खुर्द ते नलवडेवाडी रस्त्याच्या कामाला मुहुर्त मिळाल्याने स्थानिक नागरीकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. दि. 17 जुलै रोजी दुपारी 1 वाजता पाचेगांव खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच संगीता संजय भोसले यांचेहस्ते नारळ फोडुन या डांबरी रस्त्याच्या कामाला काल सुरूवात करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शासनाच्या डीपीडीसी या योजनेअंतर्गत पाचेगांव खुर्द ते नलवडेवाडी रस्त्यासाठी तीस लक्ष इतका निधी उपलब्ध झाला आहे. पाचेगाव खुर्द गावापासून 1052 मीटर लांबीपर्यंत डांबरी रस्त्याला मंजुरी मिळाली असुन काल गुरूवार दि. 17 जुलै रोजी प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. पाचेगांव खुर्द ते नलवडेवाडी हा रस्ता गेल्या साधारण 15 वर्षांपासून प्रलंबित होता. अत्यंत दयनिय अशी अवस्था या रस्त्याची झाली होती. सदर रस्त्यावरून वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असुन हा रस्ता पाचेगांव खुर्द ते राजुरी, मानेगांव, हणमंतगांव, डोंगरगांव, जवळा, सोनंद यांसह अनेक गावांना जोडणारा दुआ आहे. त्यामुळे नागरीकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याच्या कामाची सुरूवात झाली.

 

यावेळी पाचेगांव खुर्द गांवच्या लोकनियुक्त सरपंच संगिता संजय भोसले, बांधकाम अभियंता बाळासाहेब नकाते, उपसरपंच भारत मिसाळ, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष अजितपवार गटाचे प्रांतिक सदस्य डाॅ.राजकुमार मिसाळ, शिवाजी पाटील, भाउसाहेब मिसाळ, संजय भोसले, पोपट घुले, हणमंत मिसाळ, लक्ष्मण मिसाळ, गोरखनाथ भोसले, आण्णासो मिसाळ, शिवाजी मोहिते, सिद्राम घुले, गोरख मिसाळ, तेजस मिसाळ, नितीन मिसाळ, प्रशांत मिसाळ, राजेंद्र भगत, बापुसो मिसाळ, शिवाजी मिसाळ, ग्रामपंचायत शिपाई संतोष भंडगे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button