सांगोला तालुका सुवर्णकार सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री.नानासाहेब मिसाळ

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुका सुवर्णकार सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री.नानासाहेब कृष्णा मिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी मोहन सदाशिव गंभीरे (पाटील) यांची निवड करण्यात आली आहे.
सांगोला सुवर्णकार सराफ असोसिएशनची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सदरच्या निवडी करण्यात आली. त्याचप्रमाणे पक्षपंधरवड्यानिमित्त सर्व सराफी दुकाने बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
पक्षपंधरवड्यानिमित्त बुधवार दि.4 ऑक्टोंबर 2023 ते शनिवार दि.7 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत सव सराफी दुकाने बंद असणार आहेत यांची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नूतन अध्यक्ष श्री.नानासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
यावेळी सांगोला तालुका सुवर्णकार सराफ असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार नूतन अध्यक्ष श्री.नानासाहेब मिसाळ यांनी मानले व सर्वांना विश्वासात घेवून अध्यक्षपदाचा कारभार करणार असल्याचे सांगितले.