प्रा. मुकुंद वलेकर यांना बापुरावजी पेटकर काव्य सन्मान पुरस्कार जाहीर

माणदेश महाविद्यालय, जुनोनी येथील मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक व कवी मुकुंद वलेकर यांना चंद्रपूर जिल्ह्यातील ‘कवितेचे घर ‘ या संस्थेचा ‘बापुरावजी पेटकर काव्य सन्मान पुरस्कार’ जाहीर झाला आहे.संस्थेचे संस्थापक श्रीकांत पेटकर, कार्यवाह व साहित्यिक प्रा.प्रमोद नारायणे (वर्धा )यांनी पत्र पाठवून तसे कळविले आहे.सदरचा पुरस्कार हा प्रा. मुकुंद वलेकर यांच्या ‘शिवारमाती डॉट कॉम ‘या काव्यसंग्रहासाठी देण्यात येणार आहे. 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 8ऑक्टोबर,2023 रोजी सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथे भारतातील काव्य पर्यटनासाठी कार्यरत असणारी’ कवितेचे घर ‘ ही नामांकित संस्था आहे.
प्रा. मुकुंद वलेकर यांच्या ‘शिवारमाती डॉट कॉम ‘या काव्यसंग्रहाला मिळालेला हा तिसरा मानाचा पुरस्कार आहे. या अगोदर ‘मुक्त सृजन साहित्य पत्रिका,छत्रपती संभाजीनगर ‘(औरंगाबाद ) यांचा ‘मुक्त सृजन विशेष उल्लेखनीय साहित्यकृती पुरस्कार 2023,कवी कालिदास मंडळ, बार्शी यांचा ‘मेघदूत राज्यस्तरीय पुरस्कार ‘ या काव्यसंग्रहाला देण्यात आले आहेत. शेतकरी जीवनाचे अत्यंत उठावदार व वास्तव चित्रण या काव्यसंग्रहात करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे साहित्य, शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक,व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रा. मुकुंद वलेकर यांचे अभिनंदन केले आहे.