द्राक्ष है महाराष्ट्रातील शेतक-यांना आर्थिक बळ देणारे महत्वाचे फळपिक आहे. द्राक्ष उत्पादक शेतक-यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून द्राक्ष बागांना संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर घटकाचा शासकीय योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत शेतकरी तसेच लोकप्रतिनीधीव्दारे सातत्याने मागणी होती. त्याअनुसरून राष्ट्रीय कृषि विकास योजनेतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर हा प्रकल्प् द्राक्ष उत्पादक जिल्हयामध्ये राबविण्याकरीता महाडीबीटी प्रणालीवर सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हयास सन 2025-26 साठी भौतिक 13.20 हे. व आर्थिक र.रु.79.46 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे.
योजनेचा उददेश:- गारपीट व अवकाळी पाऊस यापासून डाळिंब बागांचे संरक्षण करणे,शेतक-यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे. फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरीता शेतक-यांना प्रोत्साहन देणे. ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.
योजनेची व्याप्ती- द्राक्ष उत्पादक 8 जिल्हे अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, सातारा, सांगली, जालना, उस्मानाबाद,
क्षेत्र मर्यादा- 20 गुंटे ते 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी लाभ देय राहील.
खर्चाचे मापदंड – रु.4.81,344/- प्रती एकर
अनुदान मर्यादा – रु.2.40.672/- प्रती एकर (खर्चाच्या 50 टक्के)
आवश्यक कागदपत्रे अँग्रीस्टैंक फार्मर आय डी, 7/12 (डाळिंब पिकाच्या नोंदीसह), 8-अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बैंक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतक-यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुःसीमा नकाशा. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे संकेस्थळ http://krishi.maharashtra.gov.in नजिकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजनेत सहभागी होण्यासाठी सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रवर्गातील शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेस्थळावर जास्तीत जास्त शेतक-यांनी या घटकासाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले, यांनी केले आहे.
Back to top button