नंदेश्वर येथे २००८ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांनी शाळेला बसवून दिले तारेचे कंपाऊंड

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालयातील सन २००८ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात घेण्यात आला. या स्नेहमेळाव्यासाठी एकूण ९२ विद्यार्थी-विद्यार्थिनीं उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब या स्नेहमेळाव्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
यामध्ये माजी मुख्याध्यापक विठ्ठल शिंदे,वसंत गरंडे,सहशिक्षक सुभाष पवार,दत्तात्रय जाधव,भाऊसाहेब कोळेकर,नाथाजी मेटकरी यांच्यासह विद्यमान प्राचार्य भारत बंडगर सहशिक्षक ज्ञानेश्वर नरूटे,विठ्ठल एकमल्ली,मनोहर बंडगर,महादेव मोटे,रावसाहेब कांबळे,नवनाथ मेटकरी,माधुरी पवार,रावसाहेब रामगडे, भगवान गरंडे,अनिल मदने हजर होते.
उपस्थित आजी व माजी मुख्याध्यापक व शिक्षकांचा शाल,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी दिवंगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व प्रतिज्ञा घेण्यात आली.मग विविध विषयांचे तास झाले,मनोगते,गप्पागोष्टी,संगीत खुर्चीसह विविध मनोरंजनात्मक भरगच्च कार्यक्रम झाले.
यावेळी लिंगनाथ बंडगर,बापू कसबे,बिरू गरंडे,राहुल डोरले, अमर कसबे, रामचंद्र कांबळे,सुरेखा गरंडे,प्रियांका माने,फुलाबाई डांगे,सविता दोलतडे या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. या २००८ च्या विद्यार्थ्यांनी श्री बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकूण चार एकर परिसराला तारेचे कंपाऊंड बसवून दिले.कार्यक्रमानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
या स्नेहमेळाव्यासाठी २००८ च्या बॅचचे विद्यार्थी आपल्या पत्नी व मुलाबाळांसहीत हजर होते तसेच पालक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२००८ च्या या विद्यार्थ्यांनी श्री बाळकृष्ण विद्यालयाच्या चार एकर परिसराला गोल जाळीचे तारेचे कंपाऊंड मारून दिले.याबद्दल प्राचार्य भारत बंडगर यांनी आपल्या मनोगतात या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले तसेच विद्यालयाच्या पटांगणात दिवंगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.