जवाहर विद्यालयात २००३ च्या दहावी बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा ; तब्बल २० वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा

सांगोला तालुक्यातील घेरडी येथील जवाहर विद्यालयाच्या २००३ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा नुकताच विद्यालयात अतिशय उत्साही व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. तब्बल वीस वर्षानंतर हे सर्व सवंगडी पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणामध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत एकत्र आले.
दिवाळीचा सण आनंद उत्साह आणि मांगल्याचा सण. दिवाळीच्या निमित्ताने नोकरी ,व्यवसाय आणि अनेक कारणांनी बाहेरगावी असणाऱ्या सर्वांचे मन पुन्हा एकदा गावाकडच्या ओढीने ,सर्व नातेवाईक, जुने बालमित्र, सवंगडी सहाध्यायी या सर्वांच्या गाठी भेटीची ओढ सर्वांना लागलेली असते. दीपावलीच्या या उत्सवाचे औचित्य साधून घेरडी येथील जवाहर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सन २००३ च्या दहावीच्या बॅचचा शाळेत येऊन आपल्या शालेय मित्रांसोबत जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी स्नेह मेळाव्याचे विद्यालयात आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. अनंतराव डोंगरे यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय डोंगरे, पर्यवेक्षक माने सर ,सेवानिवृत्त शिक्षक पी.जी. कुंभार, बाबासाहेब त्रिगुणे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी मनोगत मुख्याध्यापक डोंगरे सर,प्रा. भारत गरंडे, प्रा तानाजी बुरुंगले , सचिन पोळ, संतोष गुरव, गणेश अडसूळ यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ अनिल बंडगर, दत्ता खांडेकर,अहमद पठाण,चंद्रकांत आलदर,संतोष करे, बबन वाकडे, सचिन वाघमारे ,पांडुरंग मळगे,दत्ता मेटकरी,सचिन साळुंके, विनोद जगधने,अतुल नवाळे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक प्रा. भारत गरंडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिवशरण यांनी तर आभार भारत गरंडे यांनी मानले.