युवा महोत्सावामध्ये सांगोला महाविद्यालयास चार पारितोषिके; समई लोकनृत्यास व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एकोणीसाव्या
उन्मेष सृजनरंग युवा महोत्सवामध्ये येथील सांगोला महाविद्यालयाच्या संघाने चार
पारितोषिके पटकावली आहेत. या महाविद्यालयाच्या भारतीय लोकनृत्यास व्दितीय क्रमांक
मिळाला आहे.पाश्चातसमूह गायनास तृतीय, मेहंदी आणि व्यंगचित्र ललित कलाप्रकार मध्ये
अनुक्रमे व्दितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिके मिळाली आहे. हा युवा महोत्सव
गोपाळपूर (ता.पंढरपूर ) येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पार पडला. आमदार
समाधान आवताडे, अभिनेत्री सोनाली पाटील, कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर, विद्यापीठाच्या
विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.केदारनाथ काळवणे, प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या
प्रमुख उपस्थिती मध्ये या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. विविध क्षेत्रातील
मान्यवरांकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्राप्ती बागडे हिने मेहंदी या ललित कलाप्रकारामध्ये
व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. व्यंगचित्र कलाप्रकारामध्ये कु.श्रध्दा गायकवाड हिने
तृतीय क्रमांक मिळवला. या महाविद्यालयाच्या लोकृनृत्य संघामध्ये कु.दिव्यांशी बागल,
कु.ललिता चौधरी, कु.आरती बेंगलोरकर, कु.भगवती गायकवाड, कु.ऋतिका चांडोले,
कु.सारिका साळुंखे, कु.वैष्णवी ढोबळे, कु.स्नेहल वाघ, कु.पूजा आगलावे, कु.साक्षी कदम या
कलाकारांनी सहभाग घेतला होता. पाश्चातसमूह गायन संघामध्ये प्रतिक काटे, कु.प्रज्ञा केंगार,
कु.स्वाती हजारे, कु.वैष्णवी दौंडे, कु.वैष्णवी शिंदे, युवराज औरंगाबादकर या कलाकारांनी
सहभाग घेतला होता.
सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष
प्रा.पी.सी.झपके, उपाध्यक्ष ता.ना. केदार, सचिव म.सि.झिरपे, प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले
यांच्यासह सर्व संस्था पदाधिकारी, सदस्य यांनी विद्यार्थी कलाकारांचे अभिनंदन केले. या
विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.संतोष लोंढे, डॉ.राम पवार, प्रा.प्रसाद लोखंडे, प्रा.
तेजस्विनी हुलवान, प्रा.भारती पवार, प्रा.धनश्री कटप, डॉ. टी.आर.माने, डॉ. आर.आर.ताठे,
डॉ.विधीन कांबळे, डॉ.विजयकुमार गाडेकर, डॉ.नवनाथ शिंदे, प्रा.विशाल कुलकर्णी,
प्रा.एम.एस.बडवे, प्रा.एम.एस.चांडोले, प्रा.विद्या जाधव, डॉ.सदाशिव देवकर, डॉ.आनंद धवन,
ग्रंथपाल नरेंद्र पाटील, अधिक्षक प्रकाश शिंदे प्रशिक्षक रोहित पाटील, सतीश तांदळे, विजय
आलासे, संग्राम जटापुरे, तेजस पाटील, शुभम गाडगे, आदित्य सर विकी सर, बोत्रे सर ,सेजल
कवठेकर, सृष्टी शिंदे, शंकर माने यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
सांगोल्याच्या लोकनृत्याचा दबदबा कायम
मागील वर्षीच्या युवा महोत्सवामध्ये या महाविद्यालायाच्या गालो या लोकनृत्यास
व्दितीय क्रमांक मिळाला होता. या लोकनृत्याची निवड इंद्रधनुष्य या राज्यस्तरीय युवा
महोत्सवासाठी झाली होती. याही वर्षी सांगोला महाविद्यालयाचे लोकनृत्य पाहण्यासाठी
प्रेक्षकांना उत्सुकता होती. या महाविद्यालयाने या वर्षी गोवा राज्यातील दिवली हे समई
लोकनृत्य सादर केले. या नृत्यास प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या लोकनृत्यास व्दितीय
क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्यामुळे सांगोला महाविद्यालायाच्या लोकनृत्याचा दबदबा युवा
महोत्सवामध्ये वर्षी ही कायम राहिला.