सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

भोपसेवाडी येथील (जवळा पाझर तलाव क्रमांक ८) हा साठवण तलाव म्हणून मंजूर –  सरपंच सौ रंजना वगरे

भोपसेवाडी (प्रतिनिधी) मौजे भोपसेवाडी हद्दीतील गुरव तलाव (जवळा पाझर तलाव क्रमांक ८) हा तलाव रूपांतरित साठवण तलाव म्हणून नुकताच मंजूर झाला आहे. अशी माहिती भोपसेवाडीच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ रंजना वगरे यांनी दिली.
भोपसेवाडी येथील गुरव तलाव हा साठवण तलाव म्हणून मंजूर झाला असून या कामासाठी ३ कोटी ४६ लाख २२ हजार रुपये निधी शासनाच्या जिल्हा जलसंधारण या विभागामार्फत मंजूर झालेला आहे. सदरच्या पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतरित व्हावे, म्हणून पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भोपसेवाडीच्या सरपंच सौ रंजना वगैरे, उपसरपंच सोपान बंडगर,  ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा तलाव मंजूर झाला असून याचा फायदा भोपसेवाडीतील शेतकरी बांधवांना होणार आहे.
सदर तलाव साठवण तलाव व्हावा, म्हणून २६ जानेवारी, २०२३ रोजी ग्रामसभेत हा विषय ठेवून संबंधित जलसंधारण विभागाकडे सातत्याने सरपंच व ग्रामस्थांनी पाठपुरावा केला आहे. १९७२ च्या दुष्काळात हा तलाव झालेला आहे. सध्या या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत. पाण्याची गळती ही होत आहे. त्यामुळे या तलावाचा आसपासच्या व परिसरातील लोकांना फारसा उपयोग होत नव्हता. म्हणून ग्रामस्थांनी हा पाझर तलाव जर साठवण तलावात रुपांतरीत झाला तर याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. म्हणून विद्यमान सरपंच, उपसरपंच यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडे वारंवार प्रयत्न केल्यानेच हे काम संबंधित विभागाने मंजूर केले आहे. त्यानुसार सदर कामाची ई-निविदा प्रसिद्ध झाली असून त्याची मुदत दिनांक १५ – ३- २०२४ ते १- ४ -२०२४ पर्यंत असून दिनांक ३- ४ -२०२४ रोजी सदर कामाची निविदा उघडली जाणार आहे.
याबाबतची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अलीकडेच भोपसेवाडी गावचा म्हैशाळ पाणीपुरवठा योजनेत समावेश झालेला असून तेही काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे भोपसेवाडी गावातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याने गावातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
भोपसेवाडी गावाचा विकास होत असताना अनेकांचे मार्गदर्शन लाभले आहे. शेकापचे जेष्ठ नेते दत्तात्रय तात्या कोरे, बसवंत आबा यमगर, माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव यमगर, संपत्ती वगरे, माजी सभापती मायाप्पा यमगर, श्रीपती वगरे, महेश बंडगर, रामभाऊ कोळेकर, सुभाष गुरव, बाळू श्रीराम, शिवाजी मळगे महाराज, बाळासाहेब कोरे, बिरा गावडे, दाजी यमगर, सुरेश गुरव, अनिल नरळे व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच गावाचा चौफेर विकास करू शकले, असे मत सरपंच सौ रंजना वगरे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!