सांगोला लायन्स क्लबकडून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

सांगोला ( प्रतिनिधी) माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला लायन्स क्लबचे नेहमी आरोग्य,शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रांमध्ये कार्य सुरू आहे हा विचार प्रमाण मानून सांगोला लायन्स क्लबचे प्रथम उपाध्यक्ष ला.इंजि. हरिदास कांबळे (समाजसेवक) यांचे वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोला, गुणाई सुमन डेअरी,आलेगाव व श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल, सांगली यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि.१० मार्च २०२४ रोजी सकाळी १०:३० ते ५:०० या वेळेत सिद्धनाथ मंदिर आलेगाव तालुका सांगोला येथे मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेगाव येथील विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न होणार आहे
या शिबिराचे उद्घाटन सकाळी १०.३० वा. मा.आमदार ॲड शहाजीबापू पाटील (विधानसभा सदस्य, सांगोला) मा. श्री. दिपकआबा साळुंखे-पाटील ( उपाध्यक्ष, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) मा.डॉ.बाबासाहेब देशमुख (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटना) यांचे शुभहस्ते व मार्गदर्शक मा.ला.प्रा.प्रबुध्दचंद्र झपके (प्रांतपाल ३२३४ ड १ सन २००९-१० ) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तहसीलदार सांगोला संतोष कणसे, सांगोला वरिष्ठ पोलिस निरीक्षक भिमराव खणदाळे, माजी तहसीलदार संजय खडतरे, उपसरपंच राहुल ढोले,माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, लायन्स झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण,माजी सरपंच श्रीरंग (आप्पा)बाबर, बापू सखाराम कांबळे (गुरुजी), ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बाबर, सौ. सविता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
तरी आलेगाव व परिसरातील गरजू लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.ला. इंजि. हरिदास कांबळे (समाजसेवक) मा. ला. सौ. सुमन कांबळे (चेअरमन) गुणाई सुमन डेअरी, आलेगाव यांच्यासह लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.उन्मेष आटपाडीकर , सचिव ला.अंजिक्य झपके, खजिनदार ला.नरेंद्र होनराव यांनी केले आहे.