सांगोला तालुका

कोळा गावातील समाज बांधव गोपीचंद पडळकर यांच्याच पाठीशी~ संभाजी तात्या आलदर

कोळा गाव बंद ठेवून हल्ल्याचा निषेध

इंदापूर येथे गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही ओबीसी समाज निषेध व्यक्त करतो गोपीचंद पडळकर नेते आहेत आणि इंदापूरच्या सभेमध्ये त्यांनी ओबीसीची बाजू मांडल्यामुळे त्यांच्यावर दगडफेक व चप्पलफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे समस्त ओबीसी बांधवांत नाराजी आहे. समाजाला न्याय देण्यासाठी रात्रं दिवस कष्ट करणाऱ्या माणसाबाबत जर असा प्रकार झाला तर तो ओबीसी समाज कदापि खपवून घेणार नाही, कोळा गावातील ओबीसी समाज बांधव आ गोपीचंद पडळकर यांच्याच पाठीशी खंबीरपणे आहे असा खणखणीत इशारा कोळा जिल्हा परिषद गटाचे नेते माजी सभापती संभाजी तात्या आलदर यांनी दिला आहे.
कोळा ता सांगोला येथे एसटी स्टँड चौकात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला संपूर्ण गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
माजी सभापती संभाजी तात्या आलदर म्हणाले ७५ वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा समाज समाजात भांडणं लावायचं काम ओबीसीच्या व मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यावरून होत आहे. ओबीसी समाज आपलं आरक्षण टिकवण्यासाठी लढा देत आहे. समाजातील काही ठराविक जाती जर सोडल्या तर बाकीच्या अजून मुख्य प्रवाहात आलेल्या नाहीत. त्यासाठी ओबीसी समाजाचे संपूर्ण महाराष्ट्राभर महामेळावे चालू आहेत. यावेळी गोपीचंद पडळकर आपापल्या समाजाची बाजू मांडत आहेत हे बाजू मांडत असताना काही विघ्नसंतोषी माणसांनी त्यांना टार्गेट केले आहे. गोपीचंद पडळकर स्वकर्तृत्वावर मोठे झालेले नेतृत्व आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, अंगावर वीस ते पंचवीस खोट्या केसेस होऊन सुद्धा समाजाचे काम कधी त्या माणसाने थांबवले नाही. असे संभाजी तात्या आलदर यांनी शेवटी सांगितले.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य बिरा आलदर पंच म्हणाले आ गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेला हल्ला प्रयत्न निषेधार्य आहे संबंधितावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्य सिताराम सरगर, कोळा ग्रामपंचायतचे उपसरपंच डॉक्टर सादिक पटेल, समाजसेवक बिरा आलदर पंच, पत्रकार जगदीश कुलकर्णी, समाजसेवक रमेश कोळेकर पंच,शिवाजी आलदर  बाळासाहेब कोळेकर, देवा माने निलेश मदने, संदिपान आलदर, अजय पडळकर, समाजसेवक ईश्वर घाडगे, तंटामुक्त अध्यक्ष भारत इमडे, सिद्धेश्वर इमडे, चंद्रकांत आलदर, नामदेव आलदर, अशोका आबा आलदर, तातोबा सरगर युवा उद्योजक रावसाहेब आलदर

दादा मोटे, अमोल साखरे, संतोष करांडे,किरण पांढरे,अमोल मोहिते,नामदेव आलदर, अंकुश आलदर, शंकर मोहिते, मारुती हातेकर, अशोक आलदर, बिरा सरगर, बापू आलदर, तात्या एमडी अमोल माळी,प्रकाश मदने, शंकराव गोरड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक नेते बाळासाहेब कोळेकर देवा माने विठ्ठल कोळेकर निलेश मदने अजय पडळकर यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची प्रास्ताविक निलेश मदने पंच आभार अशोक आबा आलदर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!