sangola
देवसागर साधक ट्रस्टच्या वतीने गुणवंतांचा सत्कार
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मंदिरात गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनीं व नव्याने नोकरीला लागलेल्या नोकरदारांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तींचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.दत्ता सलगर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे सांगली-तासगावचे पोलिस उपअधिक्षक सचिन थोरबले,नुतन मुख्याधिकारी सोमनाथ बनसोडे, डॉ.संजय शिवशरण,बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज,माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर,माजी उपसभापती दादासाहेब गरंडे,बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक भिवा लवटे,अभियंता सुखदेव गरंडे, बाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भारत बंडगर,अध्यक्ष शिवशंकर लाड उपस्थित होते.
यावेळी नंदेश्वरसह पंचक्रोशीतील एकुण ५२ व्यक्तींचा सन्मान देवसागर साधक ट्रस्टच्या वतीने करण्यात आला तसेच आपण प्रतिकूल परिस्थितीतही यश कसे मिळवायचे याविषयी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण बंडगर यांनी केले,सुत्रसंचालन महादेव क्षिरसागर यांनी केले तर आभार संजय खांडेकर यांनी मानले.
——————————-
गावातील मुलांना आपल्या जवळच्या व्यक्तीने यश कसे प्राप्त केले याविषयी मार्गदर्शन मिळावे व यामधून त्यांनी प्रेरणा घ्यावी तसेच आयुष्यात आपल्या पायावरती खंबीरपणे उभा राहावे यासाठी आम्ही प्रोत्साहनपर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन देवसागर साधक ट्रस्टच्या माध्यमातून करतो.
– शिवशंकर लाड, अध्यक्ष