दुधाचे दर कमी होऊनही राज्य सरकार लक्ष का देत नाही -डॉ भाई बाबासाहेब देशमुख

सांगोला(प्रतिनिधी):-पाऊसाचा लहरी पणा .. उत्पादन खर्चाच्या आधारावरती शेतमालाला हमी भाव नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आला असताना दुध व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाची उपजीविका चालवणारे शेकतकरी दुधाचे दर कमी झाल्याने आणखीन आर्थिक अडचणीत सापडले आहेत.अशा परस्थितीत राज्य सरकार दुधाच्या कमी झालेल्या दराकडे लक्ष का देत नाही असा सवाल पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित केला.
सध्या राज्यातील बहुतांश भागात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे..अजुनही काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आशा परस्थितीत येणार्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.डिसेंबर,जानेवारीनंतर परस्थितीत आणखीन अडचणीची निर्माण होईल असा अंदाज आहे.या वेळेस पाऊस काळ म्हणाला तसा पडलेला नसल्याने शेतामध्ये सुध्दा पिके पहावयास मिळत नाहीत ज्यांच्या शेतात काही प्रमाणात पिके आहेत त्या पिकांच्या उत्पादनाच्या पैशातून खर्च सुध्दा भागत नाही.अशी बिकट परिस्थितीत शेतकर्यांची आहे.

अशा अवस्थेत राज्यातील शेतकरी व काही नागरीकांनी आपला मोर्चा दुध धंद्याकडे वळवला व काही लोकांनी कर्ज काढून दुध व्यवसायासाठी गाई खरेदी केल्या..व दुधाला अपेक्षीत दर नसला तरी पशुपालक शेतकरी काटकसरीने दुध व्यवसाय करीत होते. अचानकच अपेक्षीत दुधाला दर नसताना आहे त्या पेक्षा दुधाचे दर आणखी कमी झाले…व पशुपालकांचे कंबरडेच मोडले. सध्या दुधाला 26 रुपये प्रति लिटर दर देण्यात येत असल्यामुळे शेतकरी पुरता आर्थिक अडचणीत सापडला आहे..एका गाईला चारा , पशुखाद्य व देखभाल या गोष्टीचा विचार केला व त्या गाईच्या दुधाच्या उत्पादनातुन आलेले पैसे याचा विचार केला तर दुध व्यवसायीक संपुर्ण पणे तोट्यात आहे हे लक्षात येतं आहे.

सध्या राज्यातील दुध व्यवसायीक अडचणीत असताना दुध धंद्यातील मोठमोठे उद्योजक मात्र या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. मध्यंतरी दुध दर वाढीवर अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली होती . त्या समितीचा अहवाल अजुनही गुलदस्त्यात आहे.त्या समितीला बहुदा दुध उत्पादन करणार्या पशुपाकांचे काही देणं घेणं नसावे.. सध्या एखादा महिना दुधाचे दर काही प्रमाणात वाढवायचे व जास्तीत जास्त महिने कमी करायचे हा दुध दरवाढीचा लपंडाव सतत चालु आहे.या बाबींकडे राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे असताना या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना दुध उत्पादक शेतकर्यांमध्ये निर्माण झाली असल्याचेही डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितली असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.