डॉ.अमित मेटकरी यांचेकडून वारकर्यांची मोफत आरोग्य तपासणी
सांगोला(प्रतिनिधी):-युगांत हॉस्पिटलच्यावतीने डॉ.अमित मेटकरी यांनी बेळगाव येथील कार्तिकी एकादशी निमित्त आलेल्या दिंडीच्या सर्व वारकर्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.
मेडशिंगी रोड खडतरे वस्ती येथे श्री ऋषिकेश खडतरे यांच्या घरी परंपरेने दरवर्षी आलेल्या मुक्कामी दिंडीच्या शंभर वारकर्यांची आरोग्याची काळजी घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे यामुळे शहरातील जांगळे वस्ती, खडतरे वस्ती, मोरे वस्ती येथील नागरिकांनी डॉ.अमित मेटकरी यांचे कौतुक अभिनंदन केले.
खडतरे कुटुंबीयाच्या वतीने डॉ.अमित मेटकरी यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे , सेवानिवृत्ती शिक्षक जयसिंग खडतरे , डॉ. जगताप, ऋषिकेश खडतरे , ऋतुराज खडतरे, बापू खडतरे, अण्णा खडतरे ,पंडित वाघमारे , गजानन वाघमारे यांनी केले. हा सर्व उपक्रम पार पाडण्यासाठी श्री.इमरान तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेऊन मुस्लिम असून देखील वारकर्यांची सेवा आवडीने करून समाजामध्ये आदर्श निर्माण केला.