महाराष्ट्र

फुलेनगर येथील सौ.रुक्मिणी शिवाजी फुले यांचे निधन

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहरातील फुलेनगर येथील सौ.रुक्मिणी शिवाजी फुले यांचे  शनिवार दि.16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले आहे. निधनासमयी त्यांचे वय 72 होते. त्या सांगोला पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी वसंत शिवाजी फुले यांच्या मातोश्री होत्या.

त्यांच्या पार्थिववर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी ,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या तिसर्‍या दिवसाचा विधी  सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजता वाडेगाव नाका स्मशानभूमी येथे होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button