महाराष्ट्र
सांगोला कन्येचा ऑस्ट्रेलियात झेंडा…

सांगोला (प्रतिनिधी): औस्ट्रेलिया देशातील मिस इंडिया ऑस्ट्रेलिया 2024 हा अतिशय प्रतीष्ठेचा व मानाचा पुरस्कार आपल्या सोलापुर जिल्हातील आर्या वैद्य या सुकन्येस प्राप्त झाला असुन तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे….विशेष म्हणजे तिचे सान्गोला कनेक्शन असुन ती बालपणापासून सिडने ऑस्ट्रेलियात रहात आहे…
सांगोला विद्यामंदिर प्रशलेतील सेवानिवृत्त शिक्षिका मिना ठोंबरे ऊर्फ प्रतिमा कुलकर्णी यांची आर्या ही नात.आहे..मैडमची कन्या अनुप्रीत कुलकर्णी- वैद्य हिचे पती अमोल वैद्य हे सोलापुर्चे असुन ते सध्या इंजिनियर म्हणून ऑस्ट्रेलियात सन 2006 पासून सेवेत आहेत….आर्या ही मेलबोर्न येथे उच्च शिक्षण घेत असुन पहिल्याच प्रयत्नात हे उत्तुंग यश प्राप्त केल्याब्द्द्ल तिचे विशेष अभिनंदन होत आहे..