आरोपीचा वाढदिवस खुले आम सार्वजनिक ठिकाणी केल्याने संबंधीत अधिकार्यांना तात्काळ बडतर्फ करावे अन्यथा 18 डिसेंबर पासुन बेमुदत धरणे आंदोलन- तुषार इंगळे

सांगोला(प्रतिनिधी):-तहसिलदार, उपजिल्हाधिकारी , (प्रभारी कालावधी), उपविभागीय अधिकारी यांच्यासह महसुल कर्मचारी यांनी रेकॉर्डवरील आरोपी याचा वाढदिवस खुले आम सार्वजनिक ठिकाणी केल्याने संबंधीत सर्व अधिकार्यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचेकडे मंगळवार दि.28 नोव्हेंबर रोजी करण्यात आली असल्याची माहिती तुषार इंगळे यांनी दिली. यावेळी शिवसेना उपनेेते शरद कोळी, तुषार इंगळे, शेखर गडहिरे उपस्थित होते.
वाळू चोरी शासकीय कामात अडथळा आणणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय प्रांताधिकारी यांच्यासह तहसीलदार आणि तलाठी आदी अधिकारी कर्मचार्यांचा गोतावळा जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सोमवार दि 20 नोव्हेंबर रोजी सांगोला शहरात सोलापूर रत्नागिरी हायवेवरील बायपास रस्त्यावर असलेल्या हॉटेलवर रात्री 11 च्या सुमारास अधिकार्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.
ही बाब मिडीयावर प्रसारण झालेनंतर नैतिकता म्हणून या अधिकार्यानी राजीनामा देणे आपेक्षीत होते. परंतू या अधिकार्यानी तशी कोणतीही नैतिकता दाखविलेली नाही. दि. 15/12/2023 पर्यंत बडतर्फीची कारवाई न झालेस दि. 18/12/2023 पासुन विविध संघटना कार्यकर्त्यांसह सांगोला तहसिल कार्यालयासमोर बेमुदत न्याय मिळेपर्यंत शासकिय कार्यालयीन वेळेत कायदेशिर मार्गाने बेमुदत धरणे अंदोलन / उपोषण करण्यात येईल असा इशारा तुषार इंगळे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रत माहितीसाठी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे, विरोधी पक्ष नेते अंबादास (दादा) दानवे, मा. पोलिस महासंचालक सो, मुंबई, विशेष पोलिस महानिरिक्षक सो, कोल्हापूर, विभागीय आयुक्त (महसुल) पुणे, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आल्या आहेत.