सांगोला तालुका

सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे  यांची अफार्म पुणे या संस्थेच्या संचालक मंडळावर निवड.

ॲक्शन फॉर अग्रिकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र अर्थात अफार्म पुणे या संस्थेच्या संचालक पदी अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांची काल बिनविरोध निवड करण्यात आली. अफार्म संस्थेच्या सदस्यातून 11 संचालक निवडून द्यायचे होते त्यामधे 9 संचालक बिनविरोध व 2 संचालकासाठी निवडणूक पार पडली बिनविरोध संचालकांमध्ये सामाजिक कार्यकर्ते शहाजी गड हिरे यांची निवड झाली आहे.

अफार्म ही संस्था गेल्या वर्षापासुन महाराष्ट्रात ग्रामीण विकासाचे काम करत आहे.महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात पाणलोट क्षेत्र विकास, पाणी वापर संस्था सक्षमीकरण, पाणी व्यवस्थापन, वंचीत समुहांची क्षमता बांधणी, डिजिटल वित्तीय साक्षरता, महीला विकास याबरोबरच शासानाबरोबर अनेक कृषिविकास प्रकल्प अफार्म ने यशस्वी केले आहेत. कृषिविषयक धोरण ठरवण्यात अफार्म चा मोठा सहभाग नेहमी राहिला आहे. सध्या शेती क्षेत्रात नवनवीन सुधारणा होत आहेत् त्यामध्ये  अफार्म चा मोठा वाटा राहिला आहे.अशा एका मोठया संस्थेवर शहाजी गडहिरे यांची संचालक म्हणून झालेली निवड योग्य असुन या निवडीबद्दल महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केलं जात असून त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!