लोणारी समाजाच्या अस्मितेचा लढा नव्याने उभा राहणार!
सांगोल्याच्या रणांगनात कींगमेकर लोणारी समाजच असणार...

संपुर्ण महाराष्र्टात सांगोला तालुक्यात लोणारी समाज हा सर्वाधिकपणे एकवटला आहे.सांगोला तालुक्याचा विचार करीता या तालुक्यामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत हा समाज तिसर्या क्रमांकावर आहे.सुमारे पंचेचाळीस हजार ईतके निर्णायक मतदार या तालुक्यामध्ये समाजाचे आहे.असे असतानासुध्दा लोणारी समाजाला केवळ ग्रहीत धरुन प्रत्येक जण आपली राजकीय पोळी भाजुन घेण्यात मग्न आहे.वास्तविक पाहता सामाण्य परीस्थितीत कोणताही समाज हा एकाच कोणत्याही विचारधारेसोबत असत नाहि.प्रत्येक पक्षिय विचारधारेसोबत तो जोडला गेलेला असतो.परंतु जेव्हा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न येतो तेव्हा तो एकत्रित येवुन पेटून उठल्याशिवाय राहत नाहि.
सांगोला तालुक्यात या समाजाची ईतकी निर्णायक ताकत असताना सुध्दा येथिल सर्वच राजकीय पक्ष व नेते मंडळींनी या समाजाचा केवळ वापर करुन घेतला आहे.आजवर या समाजास न्याय देण्याची भूमिका कोणिहि घेतली नाही हे वास्तव आहे.लोणारी समाजाची अस्मिता असणारी व या समाजाचे पंचप्राण असणारे समाजरत्न विष्णुपंत दादरे साहेबांचे स्मारक सांगोला शहरात उभे करावे ही मागणी सर्वच नेते मंडळीकडे वारंवार करुन सुध्दा या मागणीला सर्वानीच सोईस्कर बगल दिली आहे.लोणारी समाजाकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापण करावे अशी मागणी संपुर्ण महाराष्र्टातुन पुढे आली आहे.याचाच एक भाग म्हणुन येथिल विद्यमान आमदारांनी या विषयावर विधिमंडळामध्ये ही मागणी लावुन धरावी म्हणुन समाजाच्या वतीने त्यांना निवेदन दिले तरीहि आजपर्यत या विषयावर विद्यमान आमदार महोदयांनी ब्र शब्द उच्चारला नाहि.आम.राम सातपुते,आम.जयकुमार गोरे,आम.गोपीचंद पडळकर यांनी या विषयावर विधीमंडळात आवाज उठविला त्याबद्दल त्यांचे आभार.परंतु सर्वाधिक लोकसंख्या असणार्या सांगोला तालुक्यातील कोणत्या नेत्याला या समाजाला न्याय मिळावा अशी भावणा होत नसेल तर हे त्यांच्यासाठी कीती धोक्याचे ठरु शकते याची कदाचित यांना कल्पना नसेल.खबरदार यापुढे या समाजाला गृहित धराल तर,आजवर लोणारी समाजाची सर्वानीच उपयुक्तता उपभोगली आता मात्र आमचे उपद्रव मुल्य अजमावयाला सज्ज व्हा.समाजाचे काही मुठभर गावपुढारी तुमच्या सर्वांच्याच अवती भोवती असतील याचा अर्थ सर्व समाज तुम्हृा कोणाचाच बटीक नाही.ठरावीक घरानी तुमच्या सोबत असतीलही पण हजारो घरं आजही खितपत पडली आहेत त्यांचे काय?
जर या समाजाचे तुम्हास काय सोईर सुतक नसेल तर या समाजाची निर्णायक शक्ती असणार्या तरुंणाना तुम्हि आपलेसे कसे करु शकणार?आता मात्र लोणारी समाजातील तरुन पेटुन उठला आहे.क्रांतीचे रणशिंग या मैदानातुन आम्हि फुंकत आहोत.आम्हाला आणि आमच्या अस्मितेला जो न्याय देईल त्यांना हा पेटुन उठलेला तरुण डोक्यावर घेईल पण जर वापरा आणि फेकुन द्या अशी भुमिका जर तुम्हि सर्वच मंडळी घेणार असाल तर तुम्हाला पायदळी तुडवायलाही हा समाज मागेपुढे पाहणार नाही.आता या समाजातील तरुणांचे रक्त उसळले आहे,मुठी आवळल्या आहेत आणि रणांगन पेटवायला आमची तरणी बांड पोरं तयार झाली आहेत.
ईथुन पुढे आमच्या अस्मितेची लढाई सुरु झाली आहे.नुकतीच समाजाच्या कार्यकारीणीची निवड झाली अाहे.अजुनही जम्बो कार्यकारीनी लवकर निवडली जाईल..गावोगावी लोणारी समाजाच्या अस्मितेचा प्रचार रथ पोहचेल.समाजाची अस्मीता असणारे आमचे प्रतीक व गुलाबी ध्वज घराघरावर फडकेल.आता आमच्या अस्मीता बुलंद करण्यासाठी लेखण्या सरसावल्या आणि मुलुख मैदानी तोफा धडाडायला तयार झाल्या आहेत.आणि याच लेखण्या आणि याच तोफा तुम्हा सर्वांनाच पळता भुई थोडी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत…
क्रमशा……..
प्रा.अनिल नवत्रे
प्रचार व प्रशिध्दी प्रमुख
सांगोला तालुका लोणारी समाज सेवा संघ