सांगोला विद्यामंदिरची महेक मुलाणी बॉक्सिंगमध्ये राज्यात द्वितीय

सांगोला ( प्रतिनिधी) अकोला जिल्हा क्रीडा कार्यालय व महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजची खेळाडू महेक इरफान मुलाणी इयत्ता अकरावी हिने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला व रौप्य पदकाची मानकरी ठरली. या यशस्वी खेळाडूला सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे प्रा.सचिन चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.
या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते महेक मुलाणी हिचा सत्कार करण्यात आला.यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने , ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डी.के. पाटील, क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव,सुभाष निंबाळकर,प्रा.संतोष लवटे उपस्थित होते.
तसेच या यशस्वी खेळाडूचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .