देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांचा २७वा स्मृतीदिन संपन्न

सांगोला तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती,सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष,सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांचा २७ वा स्मृतीदिन संपन्न झाला.
याप्रसंगी दादासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आणि समाधी दर्शनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी पारितोषिक वितरण व सांगता समारोह कार्यक्रम मा.श्री.बाबूरावजी गायकवाड(अध्यक्ष-सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ,सांगोला)यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.गणेश शिंदे(सुप्रसिद्ध व्याख्याते)हे लाभले होते.या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मा.श्री.अरुण भाऊ शेंडे(अध्यक्ष-सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी),मा.श्री.राजेश पाटील-वाठारकर,मा.श्री.अनिल बापु शेंडे,प्राचार्य श्री.अजित घोंगडे सर,मा.श्री.शंकर बापू लवटे, सरपंच श्री.प्रतापसिंह इंगवले,उपसरपंच श्री.अमर गोडसे,श्री.तुकाराम शिंदे,श्री.प्रभाकर कांबळे,श्री.सुनील शिंदे,श्री.प्रभाकर कसबे गुरुजी,श्री.धनाजी शिंदे,श्री.गजानन बनकर,श्री.रामानंद शेंडे सर,पर्यवेक्षक श्री.सूर्यकांत कसबे सर व संस्थेतील सर्व आजी-माजी मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य श्री.अजित घोंगडे सर यांनी केले. प्रास्ताविकामधून स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेले सर्व कार्यक्रम,स्पर्धा,संस्थांतर्गत स्पर्धांची माहिती देण्यात आली.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रशालेतील सहशिक्षक श्री.शहाजी शिंदे सर यांनी केले.
प्रमुख उपस्थितांमधून मा.श्री.राजेश पाटील-वाठारकर यांनी दादासाहेबांचे कार्य सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध व्याख्याते मा.श्री.गणेश शिंदे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आनंदी जीवनाचे महत्व पटवून दिले.त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास या विषयावर वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच त्यांनी ‘काय सांगू राणी,मला गाव सुटना’ ही कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
शेवटी स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध संस्थांतर्गत स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेतील सहशिक्षिका स्वाती वाघमारे मॅडम यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय मुंढे सर यांनी केले.