सांगोला तालुकाक्रीडा

पायोनियर निवासी गुरुकुल य. मंगेवाडी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे शानदार उ्घाटन.

खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर इंग्लिश , सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि पायोनियर निवासी गुरुकुल मध्ये  दरवर्षी प्रमाणे यंदाही  वार्षिक क्रीडा स्पर्धेला थाटात सुरुवात झाली.शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस दिवसभर या स्पर्धा होणार आहेत..

या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी  प्राचार्य अनिल येलपले सर  , सांगोला तालुका कबड्डी असोसिएशन  चे अध्यक्ष सुनील भोरे सर ,  य. मंगेवाडी चे सरपंच बापू जाविर , अजनाळे गावचे सरपंच चंद्रकांत कोळवले य. मंगेवाडी चे उपसरपंच अनिल पाटील ,  माजी सरपंच दत्तात्रय मासाळ , माजी सरपंच प्रकाश सोळसे माजी , त्रिमूर्ती अर्बन  चे चेअरमन  चंद्रकांत चौगुले ,   मुलाणी सर , तंडे सर , अजित लाडे सर पंच यांच्यासह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.इयत्ता १ ली  ते १० वी सर्व वर्गाच्या विविध  स्पर्धा घेण्यात येत आहेत..आज सर्व क्रीडा प्रकारांचे सेमी फायनल पार पडले फायनल राऊंड उद्या होणार आहेत.

 

पायोनियर गुरुकुल मध्ये विद्यार्थांच्या कलागुणांना  नेहमी प्रोत्साहन देऊन त्यांच्यात कौशल्य विकसित करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. क्रीडा स्पर्धांचे समालोचन  सांस्कृतिक विभाग प्रमुख आशुतोष रूपनर सर हे करत आहेत..या क्रीडा स्पर्धा प्राचार्य अनिल येलपले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख ,  व क्रीडा शिक्षक मोहन वाघमारे सर ,  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियोजनाखाली या स्पर्धा सुरू  आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!