चिकमहूद विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी रामहरी मुळे तर व्हा.चेअरमन पदी शेतकरी कामगार पक्षाचे दत्तात्रय सातपुते

चिकमहूद(ता.सांगोला) येथील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी आमदार शहाजीबापू पाटील गटाचे रामहरी पिराजी मुळे यांची तर व्हाईस चेअरमन पदी शेतकरी कामगार पक्षाचे दत्तात्रय दादासो सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी बाळासो भोसले यांनी आपल्या चेअरमन पदाचा व रंगनाथ महारनवर यांनी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या निवडीसाठी नुकतीच विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या ऑफिस मध्ये मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चेअरमन पदासाठी आमदार शहाजी बापू गटाकडून रामहरी पिराजी मुळे यांचा तर व्हा.चेअरमन पदासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून दत्तात्रय दादासो सातपुते यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमर गोसावी यांनी जाहीर केले.यावेळी सचिव प्रभाकर सातपुते यांनी सहकार्य केले.
यांनतर नूतन चेअरमन रामहरी पिराजी मुळे व व्हाईस चेअरमन दत्तात्रय दादासो सातपुते यांचा दिग्विजयदादा पाटील, रवींद्र कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी एकूण 13 संचालकांपैकी सात संचालक उपस्थित होते. संचालक शामराव कदम संजय पाटील, बाळदादा भोसले, राजेंद्र भोसले, संतोष सराटे उपस्थित होते.
तसेच यावेळी रवींद्र कदम,नवनाथ भोसले,महादेव गोडसे,दादासो बंडगर,सर्जेराव कदम,रणजीत कदम, सुखदेव मुळे,सुधीर मुळे,आजिनाथ जाधव,पंकज काटे,अनिल कदम,तात्यासो पाटील,महादेव पारसे, शिवाजी बंडगर,बाबा वाघमोडे,शामराव बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते.