सांगोला तालुका

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चौथ्या दिवसा अखेर सरपंचपदासाठी 21 अर्ज तर सदस्य पदासाठी 84 अर्ज दाखल

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसाअखेर सरपंच पदासाठी 21 अर्ज तर सदस्य पदासाठी 84 अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस असणार असून अर्ज दाखल करण्यासाठी मोठी रिघ लागण्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मुदत संपलेल्या 6 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर 2022 ला मतदान होणार असून 20 डिसेंबर 2022 ला निकाल जाहीर होणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावातून मोठी चुरस अनुभवयास मिळत आहे. अशा वातावरणात अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात कार्यकर्ते व्यस्त आहेत. चौथ्या दिवसा अखेर सरपंचपदासाठी चिंचोली गावातून 10, शिवणे 4, बलवडी गावातून 5, चिणके गावातून 1 व पाचेगाव खुर्द गावातून 1 अर्ज दाखल करण्यात झाले.तर सदस्य पदासाठी चिंचोली गावातून 21,शिवणे गावातून 25, बलवडी गावातून 20, चिणके गावातून 3, अनकढाळ गावातून 1 तर पाचेगाव खुर्द गावातून 14 अर्ज दाखल झाले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांना आज शुक्रवारचा अंतिम दिवस हाती राहिला आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी प्रमुख उमेदवारांची केंद्रावर गर्दी उसळणार आहे. आज विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी अर्ज छाननी, 7 डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असणार असून 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!